हॅलो ऑल,
आजचा लेख खास करून आपल्या छोट्या मित्रांसाठी बरे का !!!
आपला एक छोटा मित्र आहे रेहान. रेहान 6th मध्ये आहे, त्याच्या सोसायटी मध्ये एक वॉचमन अंकल आहेत, रेहान रोज त्या वॉचमन काकांना हाय बाय करीत असे, वॉचमन अंकल पण मुलांचे लाड करीत असत, पण आज काल वॉचमन अंकल थोडे विचित्र वागू लागले आहेत असे लहानग्या रेहान ला वाटू लागले आहे. उगाचच गालाला चिमटे काढणे, जवळ ओढून घेणे, जबरदस्ती किस करणे. हे सगळं रेहान ला अजिबात आवडत नाही.
एक छोटी मैत्रीण निक्की , 10 years old, निक्की च्या शेजारचे अंकल तिचे खूप लाड करतात, तिला चॉकलेट्स वगैरे आणून देतात, पण कधी कधी त्यांचं उचलून घेणं उगाचच चेस्टला हात लावणे , बट वर टॅप करणे निकी ला अजिबात आवडत नाही.
छोट्या मित्रांनो, हे जे काही रेहानला आणि निक्की आवडत नाही त्यालाच म्हणतात बॅड टच (Bad Touch)
आपले मम्मी पप्पा सोडून कोणीही तुम्हाला टच केले आणि तुम्हाला ते आवडले नाही तर तो बॅड टच. बॅड टच खासकरून शरीराच्या ४ ठिकाणी मानला जातो -
१. ओठ म्हणजे लिप्स
१. ओठ म्हणजे लिप्स
२. छाती म्हणजे Chest
३. पायांच्या मधली जागा किंवा सु सु करण्याची जागा
४. बसण्याची जागा म्हणजे BUM
मम्मी पप्पा तुम्हाला अंघोळ घालताना शरीराच्या त्या भागांना हात लावतात पण मग तो बॅड टच नाही, मात्र इतर कोणी उगाचच तिथे स्पर्श करत असेल तर मात्र तो बॅड टच.
जो टच तुम्हाला नाही आवडत ना मग सरळ तो बॅड टच, नो मोअर थिंकिंग बस्स !!
बॅड टच करणारे हे कोणीही असू शकतील जसे वॉचमन अंकल, इमारती मधील कोणतेही अंकल किंवा आंटी , लिफ्टमन अंकल, स्कूल मधले अंकल, घरकामाला येणारी मावशी, स्कुल मधला कोणी दादा किंवा इतर कोणीही असू शकतील, मात्र एक गोष्ट लक्ष्यात ठेवा मित्रांनो या कुणालाही तुम्हाला टच करण्याचा अधिकार नाही. जर असा बॅड टच कोणीही तुम्हाला केला तर मम्मी पप्पाना लगेच सांगून टाका, जर मम्मी पप्पा नसतील तर जे कोणी घरी आहेत आजी, आजोबा, काका ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्यांना पटकन सांगून टाका. जर तुम्ही शाळेत असाल तर लगेच आपल्या टीचर्स ना तक्रार करा अगदी वेळ न दवडता.
तुम्ही एकटे असताना जर तुम्हाला कोणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मोठ्याने ओरडा Noooooooooooo !!
अगदी मोठयाने कि तो घाबरला पाहिजे आणि पटकन तिथून पळ काढा. आणि लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचा, वेळ पडली तर त्या व्यतीचा कडकडून चावा घ्या. फोन वर १०० नंबर डायल केला तर पोलीस अंकल पण येतात तुमच्या मदतीला , वेळ पडली तर ते हि करा पण बॅड टच कधीच सहन करू नका.
हे जे मी सांगितले आहे ते लक्षात ठेवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना पण सांगा.
पालकांना (Parents ) नम्र विनंती, त्यांनी स्वतः हा ब्लॉग आपल्या पाल्यांना वाचून दाखवा, त्यांना गुड टच बॅड टच मधला फरक आपल्या परीने समजावून सांगा. मुलांच्या तक्रारींवर कधीही दुर्लक्ष्य करू नका वेळीच सावध व्हा आणि अश्या व्यक्तींची पोलिसानं मध्ये तक्रार करा, या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाऊन, त्यांना चांगलाच धडा मिळतो, अधिक माहिती साठी गूगल करा किंवा जवळच्या पोलीस मित्रांची संपर्क साधा.
आपला अभि