Tuesday, April 28, 2020

१२ जुलै १९७५ : भाग चौथा - नजरभेट

२१ जुलै १९७५

खुनावरचं सावट आणखीनच वाढलं होतं, रोज वर्तमानपत्रांमध्ये पोलिसांच्या कामाच्या ढिलाईबद्दल लिहून येत होतं, वरिष्ठांचा दबाव सतत इनामदारांवर वाढत चालला होता. राजवर्धन च्या मृतदेहावरून आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वरून एवढं स्पष्ट होत होते कि राजवर्धनचा खून इनामदारांच्याहि खुनाच्या ३ दिवस आधी झाला होता, राजवर्धनचा खून डोक्यात दगड घालून करण्यात आला होता.  त्याला जमिनीत पुरण्यात आले होते. खतासाठी खड्डा खणताना रामसेवकला राजवर्धनची बॉडी सापडली होती. राजवर्धनची माहिती फक्त नलिनीबाईंना असल्याने घरातील इतरांवर संशय येत नव्हता. नलिनी बाईंनी पती आणि मुलगा दोन्ही गमावल्याने त्या संशयितांमध्ये आत्ता येत नव्हत्या.

डॉ. जोशी हे देखील डावखुरे होते, पण जेव्हा खून झाला तेव्हा ते तिथे उपस्थित नव्हते. रावसाहेबांच्या व्हिस्की मध्ये टाकलेल्या झोपेच्या गोळ्या आणि डॉ जोशींनी रावसाहेबांना  लिहून दिलेल्या गोळ्या या वेगळ्या होत्या. म्हणजेच खुन्याने वापरलेल्या गोळ्या वेगळ्याच होत्या, एका बाजूने हे जरी मानले कि डॉ जोशी आणि नलिनीबाई यांचे काही संबंध असले तरी डॉ जोशी एवढी मोठी रिस्क घेणार नाहीत.  

दुसऱ्या दिवशी देशमुख कुटुंबीयांनी रावसाहेब आणि राजवर्धन यांच्यासाठी ठेवलेल्या शोकसभेत इनामदारांना उपस्थित राहायचे होते. पोलीस ड्युटी म्हणून आणि एक जुने ओळखीचे स्नेही म्हणूनही. रावसाहेब सोडले  तर त्यांच्या कुटुंबियांसोबत इनामदाराची फारशी ओळख नव्हती. हर्षवर्धन जरी एक चांगला वकील असला तरी त्याने वकिली क्षेत्रामध्ये इतकेही पाय रोवले नव्हते कि एका पोलीस अधीक्षकाबरोबर त्याचे उठणे बसणे व्हावे. रावसाहेबांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती होती, पण जोवर खुनी सापडत नाही तोंवर इनामदार स्वस्थ बसणार नव्हते. इतके दिवस रावसाहेबांनी हाताळलेल्या आणि  जिंकलेल्या केसेस, त्यातून असणारे शत्रू, ही शक्यताही नाकारता येत नव्हती, परंतु त्यापैकी कोणीही त्यादिवशी घटनास्थळाच्या आसपासही नव्हते.

२२ जुलै १९७५

इनामदार रावसाहेबांच्या शोकसभेला हजर होते. अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित होती म्हणून  त्यांचे सहकारी जातीने व्यवस्था बघत होते. अनेकांची भाषणे झाली, रावसाहेबांबद्दलचे आपले अनुभव बोलून  दाखवले, शोकसभेला जे अपेक्षित असते ते सगळे बोलून झाले होते, सभा संपली होती. शोकसभेनंतर भोजनाचा कार्यक्रम सुरु झाला, हळू हळू कार्यक्रम संपत आला, रावसाहेब हे स्वतः मोठे व्यक्तिमत्त्व होते म्हणूच त्यांच्या शोकसभेला अनेक मंडळी  उपस्थित होती, शेवटच्या पंगतीमध्ये रावसाहेबांचे अचानक लक्ष गेले ... आणि !!!

त्या पंक्ती मध्ये खुनी सापडला !!!

आपण हि शक्यता दुर्लक्षित कशी केली  ???? इनामदारांना  वाटू लागले

शोकसभेनंतर इनामदार आणि सहकारी स्टेशनला पोहोचले, इनामदारांनी गेल्या गेल्या कमिशनर साहेबांना  फोन  लावला आणि त्यांना सविस्तार वृत्तांत दिला

"आर यु शुअर ??" कमिशनर

"यस सर !! " इनामदार

"यु शुड री -इंटरोगेट " कमिशनर

"नो नीड सर, धिस इस कन्फर्म " इनामदार

"ओके देन, फॉलो द प्रोटोकॉल, मेक इट टुमॉरो  मॉर्निंग " असे म्हणून कमिशनर साहेबांनी फोन ठेवला.

इनामदार   सकाळची आतुरतेने वाट पाहू लागले.

क्रमशः

No comments:

Post a Comment

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...