Wednesday, April 22, 2020

चिमणराव गुंड्याभाऊ आणि पुण्या मुंबईतल्या कॅब

अश्याच एका संध्याकाळी चिमणराव (चिरा) आणि गुंड्याभाऊ (गुंभा) यांचे चहा पिता पिता अनुनासिक स्वरातले संवाद. आजचा विषय पुण्या मुंबईतल्या 'भाडोत्री गाड्या' अर्थात कॅब.



गुंभा : काय म्हणता ......
चिरा : सांगतो काय !!
गुंभा : मग ?
चिरा : मग काय वाट बघितली, याला माझे स्थान आणि मला याचे स्थान काही मिळेना, बरे भ्रमण ध्वनी वर        
          दाखवतोय कि हा उबरवाला पाच मिनिटांवर आहे.
गुंभा : मग ?
चिरा : मग काय, त्याला म्हटले लेका, आहेस तिथेच थांब मीच ओला करून तिथे येतो.
गुंभा : छे छे छे चिमणराव हे भाडोत्री गाडी प्रकरण म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्या सारखे  झालेय
चिरा : का का गुंड्याभाऊ, असे काय झाले?
गुंभा :  अहो आत्ता  हेच पहा ना, रिक्षा टॅक्सी चालकांची मुजोरी म्हणून  आपण थोडे जास्तीचे पैसे मोजून या कॅब्स            घेतो पण कधी कधी वाटते हेच महाग पडेल कि काय.आत्ता परवाचंच बघा ना
चिरा : काय ते
गुंभा : मी घरी येण्यासाठी कॅब बुक केली, पण मी जिथे उभा तिथे  हि गाडी येईच ना
चिरा : म्हणजे           
गुंभा : चालक म्हणाला मागच्या गल्लीत या
चिरा : मग?
गुंभा : म्हटला २ इमारती सोडून या
चिरा : मग?
गुंभा : रास्ता ओलांडून या
चिरा : मग?
गुंभा :मग मीच म्हणालो, दादा, पोहोचलो मी घरी, धन्यवाद !!
चिरा : एकदा तर मी स्वर्गवासी होता होता वाचलो, आयुष्याची दोरी बळकटच  म्हणायची
गुंभा : का ते ?
चिरा : भ्रमण ध्वनी वर एक संदेश आला
गुंभा : कोणता ?
चिरा : देव तुम्हाला न्यायला येत आहे
गुंभा : काय !!!!
चिरा : हो ना क्षणभर डोळ्यासमोर अंधेरीच आली
गुंभा : अंधेरी??
चिरा : माफ करा अंधारी, अंधेरी ला तर मी उभा होतो, तर मी बोलत होतो हा, संदेश...  हा, माझी तर बोबडीच                वळली.
गुंभा : अरे बापरे ! मग.
चिरा : मग काय,  नंतर कळले 'देव' हे  मला न्यायला येणाऱ्या ड्रायव्हरचे नाव होते
गुंभा : काय हे चिमणराव, तुम्ही पण ना, तुमचं अगदी आमच्या नानांच्या श्रीपती सारखे झालेय
चिरा : श्रीपतीच काय ते
गुंभा : अहो कमला उशीर झाला होता आणि ह्याने कॅब बुक केली होती ना
चिरा : अच्छा
गुंभा : मध्येच हा  ड्राइवर ला म्हणाला  लवकर चालव,  साहेब हरामखोर आहे आमचा, आणि दुसऱ्या क्षणाला     
         नोकरी गेली ना पठ्ठ्याची      
चिरा : कसे काय ???
गुंभा : त्या कॅब चा वाहक त्याचा साहेबच होता, अतिरिक्त कमाई साठी तो कॅब चालवायचा म्हणे.  
चिरा : बरयाचदा हि लोक गप्पा मारून मारून डोक्याचा पार भुगा करून टाकतात हो, वरून हे हि ऐका कि     
         यांची कमाई आमच्या पेक्षा जास्त कशी, आणि वरून आम्ही आमच्या मनाचे राजे, एका  चालकाने चक्क 
         १५ तो ळ्यांची चैन आणि १०-१२ तोळ्यांच्या अंगठ्या, कडे घातले होते, आमच्या संपूर्ण घरचे सोने काढले
         तरी सात आठ तोळ्यांपेक्षा जास्त येणार नाहीत.   
गुंभा : प्रत्येक कॅब च्या वेगळ्या तऱ्हा
चिरा : काऊ बोलावतोय गुंड्याभाऊ, येतो, भेटू पुन्हा. पण जाता जाता एक सत्य सांगतो
गुंभा : काय ते ?
चिरा : उबर चा चालक पावसात भिजला तर ओला होतो

क्षणभर  हंशा ...

आपला  अभि   


  
  

      

No comments:

Post a Comment

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...