Sunday, April 19, 2020

बायकोचे ड्रायविंगचे धडे

घरच्यांची इच्छा म्हणून गाडी घ्यायचे ठरवले आणि सगळ्यांनी ठरवून पांढऱ्या रंगाची नवी कोरी वॅगन आर गाडी घेतली, मला बऱ्यापैकी गाडी चालवता येत असल्यामुळे रोज ऑफिसला येण्या जाण्यासाठी मी गाडी वापरत असे,  पण बायकोचे ऑफिस लांब असल्याने गाडी ने येणे जाणे शक्य नव्हते, पण तरीही ना जाणे एके दिवशी तिला वाटले कि नाही, काही करून गाडी शिकलेच पाहिजे, मी एका मॉडर्न काळातील मॉडर्न स्त्री  आहे, मला गाडी चालवता आलीच पाहिजे, बस्स !!!

कमीत कमी बेसिक तरी तरी काळावं या शुध्ध्द हेतूने मग तिच्या साठी ट्रेनिंग स्कूल ला ऍडमिशन घेतले, रोज एक तास आणि एक कच्चे लायसन्स या बळावर १० दिवसांत ती गाडी चा दरवाजा उघडणे आणि बंद करणे फक्त यांत एक्स्पर्ट झाली कारण ट्रेनिंग स्कुल च्या गाड्या खरेतर ट्रेनरच चालवत असतो बाकी शिकणे वगैरे अंधश्रद्धा, म्हणूनच मागच्या जन्मीचा कोणता तरी बदला म्हणून ट्रेनर ने तिला सांगितले कि घरच्या गाडीवर हात साफ करून घ्या मग तुम्ही एक्स्पर्ट व्हाल, झाले !! 
45,495 Car Driver Stock Vector Illustration And Royalty Free Car ...

गाडीचे L लागणार होते पण त्या आधी L चा बोर्ड व्यवस्थित लावून घेतला, घेतलेल्या जीवन विम्याच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून ठेवली, मेडिकलेम विमा घरच्यांकडे देऊन ठेवला, जवळच्या हॉस्पिटल मधल्या राखीव खाटांची माहिती घेतली, एम्बुलन्स चे नंबर घेऊन ठेवले आणि स्वतःची मानसिक तयारी करून घेतली , आणि मग एके दिवशी म्हणजे एके रात्री रस्त्यावर गर्दी कमी म्हणून बायकोला घेऊन तिला गाडी शिकवायला उतरलो आणि आधी स्वतः चालवत गाडी मेन रोड वर आणली, मग बायकोला ड्रायवर सीट वर बसायला सांगितले, थोडी थेअरी म्हणून तिला A  B C सांगायला घेतली A म्हणजे एक्सलेटर, B म्हणजे ब्रेक आणि C म्हणजे क्लच.

चूक !!!!!! बायको जवळ जवळ किंचाळलीच , "चूक आहे हे".

का ??? मी प्रश्नांकित

"हे ABC नसून CBA आहे, तुम्ही चुकीचं सांगताय" इति सौ

"सौ काही असले तरी हे ABC म्हणूनच  शिकवले जाते", आपला  मुद्दा पटवण्याचा केविलवाणा प्रयत्न, कारण लॉजिकली ती बरोबर होती 

"कसे ?? तुम्ही उर्दू शाळेत इंग्लिश शिकलात का ?"  सौ चं ब्रह्मास्त्र

"ते काही असो सगळ्यांना असेच शिकवले जाते ABC not CBA" .. मी

"ते काही असो ABC चूक आहे, CBA हेच बरोबर" .... हि
Learner Driver Stock Illustrations – 374 Learner Driver Stock ...
ड्रायविंग ट्रेनिंगच्या दुनियेत नवीन क्रांती सुरु होणार होती आणि या क्रांतीची सुरुवात आमची सौ करणार होती.
आमची ढकलगाडी सुरु झाली. एक्सलेटर ब्रेक , एक्सलेटर ब्रेक.

मागून कुणाची तरी अंत्ययात्रा येत होतो, आमच्या गाडीचं स्ट्रगल  बघून  एक जण धावत पुढे आला, त्याने गाडीवर  टक टक केली . आम्ही काच खाली केली, हिला ड्रायवर च्या सीट वर आणि मला बाजूच्या सीट वर बसलेला बघून तो काय समजायचं ते समजला आणि मला म्हणाला. "दादा मागून बॉडी येतेय जरा गाडी बाजूला घ्या, आम्हाला व्यवस्थित स्मशानात पोहचू द्या, एकाचीच बॉडी जाऊद्या "

एकदा  शिकता शिकता आम्ही पेट्रोल पंपावर गेलो अर्थात ड्राइवर सीट वर हि आणि बाजूला मी, पेट्रोल भरल्या नंतर टायर मध्ये हवा भरण्याच्या माझ्या सवयीला अनुसरून हिने सुध्दा गाडी हवा भरायच्या लायनीत उभी केली, टायरमध्ये हवा भरल्या नंतर हिने त्या हवा भरणाऱ्या पोऱ्याला विचारले , "भैया, संसार कि गाडी को बॅलन्स करणे के लिये किधर को  हवा भरते है." माझी आणि त्या पोऱ्याची केविलवाणी नजरा नजर तोवर हिने दुसऱ्या गियर मध्ये टाकून गाडी सुरूपण केली. 

असेच एकदा शिकता शिकता चुकून हिने  नो एन्ट्री मध्ये गाडी घुसवली, माझ्या हि काही लक्ष्यात यायच्या आधी समोर साक्षात ट्राफिक हवालदार अवतरले.  
"काय मॅडम कुठे, नो एन्ट्री आहे " 
हिने रागात माझ्या कडे बघितले, तिची एक नजर सांगून  गेली, लक्ष्य कुठे असते तुमचे?
हवालदार : "मॅडम लायसन्स दाखवा"
त्या नंतर जे घडले त्यावर, शरमेने पाणी होणे, इज्जत चा फालुदा होणे, अब्रू च्या चिंधड्या उडणे अशा वाक्यांचा फील आला . 
"मॅडम लायसन्स दाखवा", या वाक्याच्या उत्तरावर बायकोने चक्क गळ्यातले मंगळसूत्र पुढे केले, आणि माझ्या कडे बोट दाखवून बोलली "हे बाजूलाच बसलेत,". मी गुपचूप उतरलो आणि त्या हवालदार ला फाईन देऊन मी परत गाडीत येऊन बसलो             
                 
Woman driver driving school panic calm Royalty Free Vector
कालांतराने तिची गाडी शिकायची इच्छा कमी झाली, मी पण सुटकेचा निश्वास टाकला, कारण  काही गोष्टी तिला समजावणे खरेच कठीण होते, जसे कि गाडीचे आरसे हे आपले तोंड बघण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी नसतात, ब्रेक मारायचा म्हणजे नवऱ्याचा राग त्यावर काढायचा नसतो वगैरे वगैरे. पण बायकोला गाडी शिकवणे हा सुद्धा एक वेगळा अनुभवच असतो. 

आपला अभि       

        

2 comments:

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...