Saturday, April 25, 2020

१२ जुलै १९७५ : भाग दुसरा - खून कोणी केला?

तारीख : १४ जुलै १९७५
स्थळ : शिवाजीनगर पोलिस स्टेशन
वेळ : सकाळ १० वाजून ३० मिनिटे

पो. नि. शिंदे, इन्स्पेक्टर पाटील, हवालदार सुर्वे आणि हवालदार कदम हि टीम गेले चोवीस तास रावसाहेब केसवर काम करत होती. त्यांनी केस बद्दलचा आपला अहवाल इनामदारांसमोर सादर केला. रावसाहेबांच्या घरी स्वतः रावसाहेब सोडून ज्या इतर व्यक्ती होत्या त्या म्हणजे रावसाहेबांची पत्नी नलिनी, मोठा मुलगा हर्षवर्धन म्हणजेच हर्ष, मुलगी निशा, तिसरा मुलगा राजवर्धन म्हणजेच राज, हर्ष ची पत्नी मेघना, हर्ष आणि मेघनाचा पाच वर्षांचा मुलगा कबीर यांव्यतिरिक्त घरातील नोकर माणसं  म्हणजे बंगल्याचे पूर्णवेळ नोकर किसन आणि सखु, बगिच्याचा माळी रामसेवक आणि बंगला, बगीचा आणि रावसाहेबांचा इतर जवळपासच्या मालमत्तेचा रखवालदार चरणसिंग. आजवर इनामदारांना  रावसाहेबांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण टीम ने जमवलेल्या माहितीमुळे रावसाहेबांचे डोके चक्रावून गेले, कारण मिळालेल्या माहिती नुसार जवळ जवळ  हे सगळेच संशयित होते, रावसाहेबांनी एक एक संशयिताची माहिती पुन्हा एकदा वाचायला सुरुवात केली .

संशयित क्रमांक एक : नलिनी रावसाहेब देशमुख
नलिनी हि रावसाहेबांची दुसरी पत्नी, रावसाहेबांच्या पहिल्या पत्नीने म्हणजे जानकी बाईंनी बावीस वर्षांपूर्वीच आत्महत्या केली होती, हर्ष  आणि निशा हे दोघे जानकी आणि रावसाहेब यांची अपत्ये, ज्यावेळी जानकी बाईंनी आत्महत्या केली तेव्हा हर्ष दहा आणि निशा सात वर्षांची होती, असे म्हणतात जानकीबाईंच्या आत्महत्येमागे राबवसाहेब आणि नलिनी यांचे प्रेमसंबंधच कारणीभूत होते, आणि झाले हि असेच, जानकीबाई गेल्या नंतर वर्षभरातच रावसाहेबांनी नलिनीबरोबर लग्न केले. असेही म्हणतात लग्नानंतरहि नलिनी रावसाहेबांबरोबर एकनिष्ठ नव्हत्या, पण रावसाहेंबांच्या डोळ्यांवरची अंध-विश्वासाची पट्टी कोणी काढू शकले नाही. रावसाहेबांच्या इस्टेटीपैकी मोठा हिस्सा आपल्याला आणि आपल्या मुलाला मिळावा अशी त्यांची इच्छा असू शकते म्हणून नलिनी प्रमुख संशयित होत. 


संशयित क्रमांक दोन : राजवर्धन रावसाहेब देशमुख
राज  हा रावसाहेबांचा तिसरा मुलगा, म्हणजेच रावसाहेब आणि नलिनी यांचा मुलगा, रावसाहेबांचे कोणतेच गुण राज  मध्ये नव्हते. लहानपणापासून मोठ्या घराण्याचा एक वारसदार अशीच भावना मनात असल्यामुळे आणि घरातला  सगळ्यात लहान म्हणून त्याच्या डोक्यात बरीच हवा होती, कॉलेजचे शिक्षण हि व्यवस्थित होत नव्हते आणि त्यातच त्याला सिगारेट आणि दारूचे व्यसन लागले होते. राज च्या रोजच्या कटकटींना वैतागून रावसाहेबांनी त्याला घरातून हाकलून दिले होते आणि त्यामुळेच राजच्या मनात आपल्या वडिलांबद्दल एक प्रकारे राग निर्माण झाला होता. नलिनी आपल्या मुलाला नेहमीच पाठीशी घालीत, त्याला बाहेर काढल्यानंतर हि राज चे सगळे व्यवस्थित चालावे म्हणून त्या वेळोवेळी त्याला हवे तितके पैसे पाठवीत. राज बरोबरच्या अश्या वर्तणुकीमुळे नलिनी बाईंना देखील रावसाहेबांचा राग आला होता. राज च्या अशाच वागणुकीमुळे तो हि एक संशयित होता. 


संशयित क्रमांक तीन : हर्षवर्धन रावसाहेब देशमुख
हर्ष वर संशय घेण्याचे कारणही तसेच होते, हर्ष ची बुद्धिमत्ता रावसाहेबांच्या तोडीस तोड होती तो हि वकील होता, त्याची प्रॅक्टिसहि जोरात चालू होती, पण आपल्या आईच्या आत्महत्येस तो रावसाहेबांना जबाबदार मनात होता. ज्या वेळेस जानकी बाईंनी स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते, त्यावेळेस घरात कोणी नव्हते पण सात वर्षांच्या निशाने हे सगळे आपल्या डोळ्यांनी पहिले होते, या गोष्टीचा निशाच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता, तिला मध्ये मधे मधे वेदाचे झटके येत, निशा पूर्ण वेडी नसली तरी तिचे आयुष्य सामान्य मुलींसारखे बिलकुल नव्हते निशाच्या या अवस्थेला देखील रावसाहेबच  जबाबदार आहेत म्हणूनच या गोष्टीचा संताप हर्ष च्या मनात खदखदत होता.

संशयित क्रमांक चार : मेघना हर्षवर्धन देशमुख 
रावसाहेबांच्या मनाविरुद्ध हर्ष ने प्रेमविवाह केला होता, मेघनाहि हर्ष ची क्लासमेट होती, एका सामान्य घरातून असल्यामुळे रावसाहेब या लग्नाविरुद्ध होते पण दुसरा पर्यायच नसल्यानं त्यांनी लग्नाला परवानगी दिली होती, पण रूढीवादी विचारांच्या रावसाहेबांनी मात्र सुनेला प्रॅक्टिस करायची परवानगी दिली नाही. हर्षहि वडिलोपार्जित इस्टेटच्या हव्यासापोटी काही बोलला नाही. मात्र हे सगळे लग्न झाल्यावर घडल्यामुळे मेघनाचाही  रावसाहेबांवर राग होता. मेघना प्रमुख संशयित नसली तरी जोवर खरा आरोपी मिळत नाही तोवर मेघनालाहि संशयित म्हणूनच राहावे लागणार होते    

संशयित क्रमांक पाच  : माळी रामसेवक
किसन आणि सखू  हे रावसाहेबांचे जुने आणि विश्वासू नोकर होते, किसनच्या सांगण्यावरून हे कळाले  होते कि रामसेवक माळी याचा रावसाहेबांवर राग होता, रामसेवक हा रावसाहेबांचा जुना माळी  शंकरचा मुलगा होता. शंकरच्या मृत्यूनंतर रामसेवक स्वतः बागकामाची कामे करीत होता. रामसेवकाला खूप लवकर श्रीमंत व्हायचे होते, शॉर्टकट मध्ये, एकदोनदा घरात चोरी करताना पकडला देखील होता, परंतु शंकर च्या कामामुळे रावसाहेबांनी त्याला फक्त समज देऊन सोडला होता. रामसेवकाची निशावरहि वाईट नजर होती, परंतु तो तिच्यापर्यंत पोहचू  शकत नव्हता. "म्हाताऱ्याला मारून त्याच्या मुलीशी लग्न करेन आणि या घराचा मालक होईन" असे अनेकदा  तो किसनला दारूच्या नशेत म्हणाला होता. इनामदारांना  रामसेवक एवढे मोठे धाडस करेल असे वाटत नव्हते. 

संशयित क्रमांक सहा : डॉक्टर जोशी
सखूच्या सांगण्यावरून, रावसाहेबांचा डॉ जोशींवर खूप विश्वास होता, दोघांमध्ये दाट मैत्री होती पण जोशींच्या मनात काहीतरी वेगळेच असायचे, नेहमी  रावसाहेबांना भेटण्याआधी ते नलीनीला त्यांच्या बेडरूम मध्ये भेटायला जायचे. नालीनि देखील बरयाचदा त्यांच्या क्लिनिक मध्ये भेटीला जायच्या. घटनेच्या दिवशीहि डॉ जोशी आणि रावसाहेबांचे वकील उपाध्याय सात वाजता भेटायला आले होते, उपाध्याय लवकर निघून गेले पण जोशी मात्र तेथेच होते,  रावसाहेबांच्या मृत्यूच्या अर्धा तास आधी जोशी निघून गेले होते. जेव्हा घरच्यांनी रावसाहेबांची अवस्था बघितली तेव्हा त्यांनी डॉक्टरांना तात्काळ बोलावून घेतले. जोशींची हि वर्तणूक त्यांना प्रमुख आरोपी म्हणून सिद्ध करत होती पण सबळ पुरावा असा काहीच नव्हता.                
इनामदारांनी संशयितांची फाईल बाजूला ठेवली आणि त्यांची विचारचक्रे सुरु झाली, केस हाय प्रोफाईल होती, कोणतही चुकीचं  पाऊल अंगाशी येऊ शकतं. घरातल्या सगळ्यांना केस संपेपर्यंत विनापरवानगी शहर सोडून जाण्याबाबत मनाई करण्यात आली. सर्व संशयितांपैकी कोणीही खरा आरोपी असू शकतो किंवा कोणीही नसू शकतो आत्ता ते पुरावा हाती लागेपर्यंत सांगणे अशक्य होते. सगळ्यांचे हेतू जरी वेग वेगळे असले तरी कोणी एकानेच आपला हेतू अमलात आणलाय हेच खरे होते. शेवटी पैसा, अहंकार, वासना आणि बदला या गोष्टी माणसाला प्रत्येक नात्यापासून वेगळ्या ठेवतात, आणि त्याची नाशा  चढली कि माणूस कुठल्याही थराला जातो. 

पण मग या खुन्या मागचा नेमका हेतू काय?? 

पैसा??   अहंकार ????   वासना   कि बदला ???

क्रमशः                 
           

No comments:

Post a Comment

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...