Friday, April 24, 2020

१२ जुलै १९७५ : भाग पहिला - खून

दिनांक : १२ जुलै १९७५
वेळ : रात्रीचे  ९ वाजून ३० मिनिटे 
स्थळ : शिवाजीनगर पोलीस चौकी  

ट्रिंग ट्रिंग .... पोलीस स्टेशनमधल्या टेबलावरचा फोन,....  "हॅलो, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, येस,  एस पी  इनामदार  बोलतोय बोला ....... व्हॉट, ओह माय गॉड !! !!!! ....... आम्ही पोहोचतोच पण तुम्ही कुठेही हात लावू नका". फोन ठेऊन देऊन इनामदार उठले. इनामदार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक होते, त्यांच्याकडे थेट फोन येण्यामागे तसेच कारणही  होते. निरीक्षक, उपनिरिक्षक आणि दोन हवालदार अशा पाच  जणांची तुकडी घेऊन इनामदार पटकन निघाले. त्यांना लवकरात लवकर पोहोचायचं होतं, कारणही तसंच होतं, शहरातल्या नामी श्रीमंत अशा रावसाहेबांच्या बंगल्यावरून फोनआला होता . 

रावसाहेबांचा खून झाला होता .... 
    
पावसाळ्याचे दिवस होते, बाहेर जोराचा पाऊस पडत होता, दहाच्या सुमारास इनामदार आणि त्यांची टीम रावसाहेबांच्या बंगल्यावर पोहोचले होती, दारातच बंगल्याचा गडी उभा होता, तोच या सर्व पोलिसांना सरळ राबसाहेबांच्या स्टडीरूम मध्ये घेऊन गेला. इनामदार आत गेले आत मध्ये रावसाहेबांचा मुलगा, सून आणि बायको होती. त्यांची बायको रडत होती, सून सांत्वन करत होती, त्यांचा मुलगा डॉक्टरांबरोबर बसला होता, पोलिसांना पाहून सगळे उभे राहिले, इनामदारांनी डॉक्टर सोडून सगळ्यांना बाहेर जाण्याची सूचना केली आणि  प्रकारची पाहणी करण्यास सुरुवात केली. रावसाहेबांची स्टडी रूम बरीच भव्य होती, असणारच कारण रावसाहेब शहरातील मातब्बर वकिलांपैकी एक होते, त्यांनी लिहिलेल्या कायद्याविषयीच्या पुस्तकांचा रेफरन्स स्टडी म्हणून विद्यापीठात उपयोग होत असे, राज्यातल्या अनेक  बड्या प्रस्थांची प्रकरणे त्यांनी अगदी सहजच सोडवली होती, त्यांच्या वकिलातीची फी पण तशीच होती. इनामदार पोलीस निरीक्षक असल्यामुळे रावसाहेबांच्या या स्टडीरूम मध्ये ते यापूर्वीही अनेकदा आले होते, पण केसेस बद्दल डिस्कशन करायला. पण आज या स्टडीरूम मध्ये येण्याचं कारण वेगळं होतं. इनामदारांनी कधी कल्पनाच केली नव्हती कि त्यांना या कारणासाठी पण कधी इथे यावे लागेल. इनामदारांनी कल्पना जरी नसली केली तरी एक पोलीस अधीक्षक म्हणून या गोष्टी त्यांना नवीन नव्हत्या. 

इनामदारांनी पो. नि. शिंदे यांना थांबवून घेत आपल्या बाकी टीम ला बाहेर इतरांशी बोलून परिस्थीतीचा अंदाज लावण्यास आणि शक्यतो मिळेल ती माहिती गोळा करण्यास सांगितले. आत्ता स्टडी रूम मध्ये फक्त चारजण होते. इनामदार, शिंदे , डॉक्टर जोशी आणि मृत रावसाहेब. इनामदार आणि शिंदेनी पाहणी सुरु केली, स्टडीरूम अगदी टापटीप होती, रावसाहेबांचे मृत शरीर खुर्चीवर पसरलेल्या अवस्थेत पडले होते, टेबलावर त्यांचा व्हिस्की चा ग्लास पूर्ण भरलेला होता. इनामदार आणि शिंदे आपल्या परीने स्टडीरूम मध्ये मांडलेल्या  गोष्टी तपासून बघत होते. रावसाहेबांच्या गळ्यावर निशाण होते, कोणी तरी त्यांचा गळा आवळला होता, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होती कि गळा आवळून खून झालाय, दोन प्रश्न होते कोणी? आणि का?

"बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची आहे !!" -   डॉ जोशींच्या बोलण्याने इनामदारांचे लक्ष वेधले गेले. रावसाहेबांची बॉडी पोस्टमॉर्टेम ला नेण्यात आली. टीम ने घटनास्थळी पुरावा सदृश असणाऱ्या गोष्टी जमवायला सुरुवात केली. इमानदारांनी  लागणारे सोपस्कार लवकर पूर्ण करायला सांगितले. सगळ्या गोष्टी होई पर्यंत पहाटेचे तीन वाजून गेले होते. इनामदार आणि त्यांचे सहकारी पोलीस स्टेशन ला पोहोचले होते. एका गोष्टीची जाणीव त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना करून दिली कि हि एक हाय प्रोफाइल केस होणार आहे, रावसाहेबांच्या घरातून, नातेवाईकांपासून ते मीडिया, राजकारणी आणि आपल्या सुपीरिअर्स कडन आपल्यावरहि केस लवकरात लवकर सोडवण्यासाठी दबाव येणार आहे तेव्हा ह्या केस मध्ये कुठलीही चूक आपल्याला महागात पडू शकते म्हणून आपल्याला सावधपणे आणि तितक्याच लवकर हि केस सोडवली पाहिजे.     

कोणी केला असेल खून आणि का?

क्रमशः        


2 comments:

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...