गावात लगबग सुरु झाली होती, मोठ मोठाले टेम्पो गावात आले होते. जत्रा तर नव्हती, जत्रेला अजून बराच अवकाश होता. आणि इतके पॉश टेम्पो आणि गाड्या म्हणजे काही तरी वेगळेच होते. कानावर पडल्याप्रमाणे गावात पिच्चरचं शूटिंग होणार होतं. कोणत्या पिच्चरचं ? हिरो ,हिरोईन कोण हे अजून तरी कळले नव्हते, पण पिच्चरचं शूटिंग म्हणून गावकऱ्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. काही शहरी, काही विदेशी पाहुणीमंडळी गावामध्ये आली होती.
कसले शूटिंग? कोण येणार वगैरे गोष्टी सरपंचांना नक्की ठाऊक असणार उगाचच का त्यांनी नुकताच वाड्यावर नवीन रंग काढून घेतला होता? एसी बसवून घेतला होता. जे कोण हिरो हेरॉईन असणार त्यांना पाहुणचाराला घरी बोलावणार आणि शायनिंग मारून घेणार. पण कोण येणार वगैरे गोष्टी त्यांनी उघड केल्या नव्हत्या.
मोऱ्या गावाला निसर्गाचा खूप मोठा आशीर्वाद लाभला होता. मोठं मोठाले डोंगर, हिरवाईची अपूर्वाई, नदी, धबधबा, उबदार वातावरण. गावकरीही निसर्गाचं ऋण जाणून होते, म्हणूनच त्यांची वर्तणूकही शिस्तबद्ध अशीच होती. सरकारच्या योजनांच्या कुबड्या गावाने कधीच धरल्या नव्हत्या. 'आपला विकास आपणच' हे गावचे धोरण होते, मग जर कुणाला अश्या निसर्गदत्त भागाची भुरळ न पडती तर नवलच, म्हणूनच एका चित्रपट निर्मिती करणाऱ्या मोठा संस्थेने आपल्या चित्रपटाचा काही भाग या गावात चित्रित करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे पूर्ण समूह या गावात आला होता.
पारा पारावर गप्पांचा फड जमू लागला होता, नदीकाठी, विहिरीवर, गावच्या वाण्याच्या दुकानात सगळीकडे एकाच चर्चा, गावात पिच्चरचं शूटिंग.
"अरे गण्या हिकडं ये " पारावरच्या एकानं लगबगीनं जाणाऱ्या गण्याला बोलावलं. गण्या सरपंचाच्या घरातला एक सांगकाम्या नोकर होता. "कुठं चालला रं "
"कामं हायेत, सरपंचांनी तालुक्याला जायला सांगितलंय सामान आणायला चाललो, पाव्हणं येणार हायेत"
"जाशील लेका, कोण पाव्हणं ते तर सांग, पिच्चरची हायती ना, खरं सांग गड्या, पिच्चरचे हिरो हिरोईन येणार ना ? "
"हिरो नाय, फक्त हिरवीन"
"फक्त हिरोईन? कोण हाय रं हिरोईन? "
"ती रं , ती हाय ना लावनी लावनी का कोणी तरी"
"कोण?"
"आरं ती न्हाई का, तिचे ते वाले व्हिडीओ मोबाईल मध्ये बघितले व्हते, हा ती रं, बॉबी लावनी"
गण्या निघून गेला. पारावरचे सारे खुश झाले होते, गावात चक्क बॉबी लिओनी येणार होती. दोन दिवसांनी शूटिंग सुरु झाली होती, काम धंधे सोडून सारे गावकरी शूटिंगच्या ठीकाणी जमत असत. शुटिंगचा शेवटचा दिवस होता दुसऱ्या दिवशी बॉबी परत जाणार होती, म्हणून तिने सरपंचांना गाव दाखवण्याचा आग्रह केला. सरपंच गण्या बॉबी आणि बॉबीचे काही क्रूमेम्बर्स गावबघायला बाहेर पडले. बऱ्याच गोष्टी पाहून झाल्यावर बॉबीने सहजच विचारले ते तिथे काय आहे?
सरपंचांना आणि गाण्याला ज्याची भीती होती तेच झाले, बॉबीने टेकडीवरच्या मंदिराकडे बोट दाखवले. सरपंच आणि बॉबी टाळाटाळाच करत होते पण शेवटी बॉबी ने लाघवीपणे विचारले "सांगा ना ... " आणि सरपंच विरघळलेच.
"ते गावंच जागृत देवस्थान आहे टोणग्यास्वामीचं मंदिर, त्या मंदिरात सहसा कोण जात नाही कारण तो देव जागृत आहे, आणि जर का त्या मंदिरात गेल्यावर मनात काही पाप आलं तर ती व्यक्ती जिच्या मनात पाप आलय त्या व्यक्तीवर देव को कोपतो आणि ती व्यक्ती लगेचच गायब होते. अश्यावेळी ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट होतो मंदिरातल्या घंटा जोरात वाजू लागतात. "
"असे कुठे होते का, काही पण नॉन्सेन्स " एक क्रूमेम्बर
"खरं हाय सरपंचाचं, मंदिरात गेल्यावर मनात वाईट विचार आलं कि टोणग्यास्वामी लगेच त्या माणसाला गायब करतो, सरपंचांच्या वडलांना तसेच गायब केले जेव्हा ते पाटलीन बाईसोबत आत गेले, पाटलीन बाईंना बघितले आणि लगेच गायब " सरपंचांनी गाण्याकडे रागाने बघितले. "अशी खूप जन गायब झालती."
" आय वॉन्ट टू सी, मला बघायचंय ". बॉबी लिओनीने हट्टच धरला,सरपंचांनी क्रूमेम्बर्सनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना तिचा बॅकग्राउंड चांगलाच माहित होता, त्यात ती गाव बघायला तोकडे कपडे घालून आली होती, अर्धा गाव त्यांच्या मागेच होता, अशा परिस्थिती बॉबी आत जाणार म्हणजे नक्कीच गायब होणार, पण बॉबी काही ऐकेना, आणि तिच्यासोबत मंदिरात जायला कोणी धजावेना. शेवटी बॉबीने आत एकटीनेच जायचा निर्णय घेतला.
सगळेजण बाहेर थांबले, बॉबीने मंदिराचा दरवाजा उघडला, आत शिरली, समोर असलेल्या टोणग्यास्वामीच्या मूर्तीला नमस्कार करायला वाकली, तोच विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, मंदिरातील घंट्यांचा घंटानाद,मंदिराभोवती काळे ढग जमा झाले, वातावरण बिघडू लागले. बाहेरची मंडळी काय समजायची ती समजली. थोड्यावेळाने सर्व शांत झाले, बाहेर जमलेले सगळे भयभीत होऊन परत जायला निघाले तोच मागून आवाज आला .
"हॅय वेट फॉर मी " गावकऱ्यांनी चमकून मागे बघितली, बॉबी लिओनी होती, अगदी सहीसलामत.
बॉबी जवळ आली सरपंचांनी विचारले, "अहो मॅडम तुम्ही तर सहीसलामत आहात मग हा एवढा आवाज, देवाचा प्रकोप, काय झालं काय ???"
बॉबी लिओनी तिच्या मधाळ आवाजात उच्चारली "देव गायब झालाय !!!! "
समाप्त
आपला अभि,
Ha ha haa. Kamal
ReplyDeleteYo..
Delete😀😀 ..... chhan
ReplyDeletethanks
Delete