शॉन अतिशय शांत, संयमी, होता, इतरांना मदत करण्याच्या बाबतील शॉन खूप प्रसिद्ध मी होता, वेळेच्या बाबतीत खूप शिस्तबद्ध आणि कंमिटमेन्ट पाळणारा आणि लाईफ मध्ये सकारात्मक असणारा, त्या विरुद्ध शेरॉन, सतत नकारात्मक विचार मनात, माईक बद्दलची भीती त्याचा दारात म्हणून सतत एकटी, शॉन सतत तिची काळजी घेत असे.
शेरॉन जन्माने जरी ख्रिश्चन असली तरी लहानपणापासून तिच्या वर हिंदू धर्माचा देखील प्रभाव होता, म्हणून एकदा पाडव्याच्या दिवशी शॉन ने खास तिला लक्ष्मीची मूर्ती दिली होती, त्यावेळेस शेरॉन खूप भारावली होती, कारण तिची पहिली पाडवा भेट होती ती मूर्ती. त्या मूर्ती कडे पाहून तिला फार सकारात्मक वाटे, शॉन ने तिला सांगितले होते हि मूर्ती जपशील म्हणजे माझे मन जपशील. शॉन मध्ये मध्ये तिला बऱ्याच गोष्टी गिफ्ट करीत असे, ती आजारी असताना माईक कधीच तिच्या जवळ नव्हता , पण शॉन मात्र तिच्या सोबत असे तिला जबरदस्तीने डॉक्टर कडे घेऊन जाई, तिच्या औषधांची काळजी घेई , शेरॉन ची आर्थिक परिस्थिती शॉन ला होती, म्हणून शेरॉन ला बऱ्याचदा मदत करीत असे. शेरॉन ला शॉन चा बऱ्या पैकी आधार होता.
माईकचा उपद्रव आत्ता वाढत चालला होता, त्याला बायकोला आनंदी असलेले बघवत नसावे बहुतेक, शेरॉन ने घर सोडल्या पासून ते ऑफिस ला पोहोचे पर्यंत तो तिला कॉल वर सतत बिझी, सतत व्हिडीओ कॉल करायचा, शेरॉन हि भलती वस्ताद, तिला त्याचे सगळे राग रंग ठाऊक होते तीही त्याला पुरुन उरायची .
पण आत्ता आधीसारखे दिवस राहिले नाही. घरमालकाच्या सततच्या पाठपुराव्याला वैतागून तिने घर शिफ्ट करायचा निर्णय घेतला. त्या काळात तिने शॉन कडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले. शॉन हे सगळे बघत होता. इतर सहकाऱ्यांशी जवळीक आणि आपल्याकडे दुर्लक्ष्य हि बाब त्याला सतत खटकू लागली , शेरॉन देखील त्याच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करू लागलीं होती, कारण दुसरेच असावे बहुतेक, पण एकदा शॉन ने तिच्या समोर आपल्या मनातील सल बोलून दाखवली आणि तो रडू लागला , शेरॉन ला ते पाहावले नाही, शॉन खूप इमोशनल आहे म्हणून तिने त्याला वचन दिले कि आयुष्याच्या अखेर पर्यंत ती त्याच्या सोबत राहील. मुळात शेरॉन कमिटमेंट पाळण्याच्या बाबतीत खूप मागे होती. वेळ पाळणे आणि कमिटमेंट पाळणे यावर भरवसा ठेवणे कठीण होते. पण शॉन या सगळ्या गोष्टी वेळोवेळी तिला सांगून समजावण्याचा प्रयत्न करायचा पण नेहमीच पालथ्या घड्यावर पाणी. शॉन ला माहित होत चालले होते कि शॉन आत्ता हातातली वाळू होत चालली आहे जी हळू हळू निसटत जात आहे.
आत्ता तर रोज रोज शेरॉन आणि शॉन मध्ये सुद्धा वाद विवाद होऊ लागले, ना शेरॉन आधी सारखी राहिली होती ना रॉन, एक मात्र जरी खरे असले कि दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नसले तरी आत्ता त्यांच्या मध्ये इगो येऊ घातला होता , शेरॉनच शॉन बद्दलच वाटणं कमी कमी होऊ लागले होते, शॉन ने देखील ठरवले होते जे होईल ते होईल पण आत्ता रडायचं नाही.
बहुतेक हि एका अंताची सुरुवात होती.
क्रमशः
No comments:
Post a Comment