Saturday, March 28, 2020

PART 1 : Sharon आणि Shown

शेरॉन आज परत पहाटेपर्यंत रडत रडत झोपी गेली. माईक ने आज पुन्हा एकदा धिंगाणा घातला, रोज प्रमाणे दारू पिऊन उशिरा घरी आला आणि रोजप्रमाणे शेरॉन चे कुणाबरोबर तरी नाव जोडून तिला शिव्या घालून मारू लागला होता. हे रोजचेच होते. कधी हातात मिळेल ती वस्तू फेकून तो तिला मारत असे. एकदा दारूच्या नशेत कोपऱ्यात  ठेवलेली क्रिकेट ची बॅट उचलून तिला मारायला निघाला होता तेही पहाटे अडीज वाजता . त्याचे  ते रौद्र रूप पाहून त्यांचा सहा वर्षांचा छोटा रॉन जोर जोराने रडायला लागला. ते पाहून माईक थोडा वरमला आणि त्याने ती बॅट टाकून दिली आणि शेरॉन ला शिव्या देऊन झोपी गेला.  

नवीन जॉब लागल्यापासून हे सगळे सुरु झाले होते, शेरॉन चे दिवस बदलले जे आधी वाईटच होते, ते आणखीनच वाईट होऊ घातले होते. पण त्यातही काही चांगले होते ते म्हणजे शॉन.  शॉन म्हणजे शॉरॉनचा एंजल होता. 

शेरॉन ने नवीन जॉब स्वीच केला होता, शॉन तिचा सहकारी होता.  शेरॉन ने घरच्या परिस्थितीमुळे स्वतःला इतरांपासून दूर ठेवले. घरच्या जबाबदाऱ्या, त्यात  माईकचा नाकर्तेपणा, रॉन चं फ्युचर याचमुळे तिच्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर होता. इतके टेंशन असताना देखील शॉनच सोबत असणे तिला दिलासादायक असायचं. तो जवळ असताना ती तिच्या आयुष्यातील सारी टेन्शन्स विसरून जायची.  तिच्याबद्दल सर्व काही माहित असणारा जगातला एकमेव व्यक्ती हा  फक्त शॉन आणि शॉनच होता, अगदी माईक सुद्धा नाही.  शॉननेही तिला बरयाचदा हवी तशी मदत केली अगदी आऊट ऑफ द वे जाऊन सुद्धा, शेरॉन  ने देखील तिच्या परीनं शॉन चे वेळोवेळी आभार मानले होते, अर्थात हि फक्त मैत्री नव्हती कारण, दोघेही मैत्रीच्या पुढे कधी गेले कळलेच नाही. 

एकदा शेरॉन छोट्या रॉन ला घेऊन शॉन ला भेटायला गेली, शॉन ने रॉन ला देखील आपलेसे केले. छोटा रॉन  शॉन अंकल वर एवढा प्रभावित होता कि तो हि शॉन अंकल ला एंजल ऑफ गॉड मानायचा , त्याला हि शॉन बद्दल एव्हढी  आपुलकि वाटायची कि शाळा सुटल्यावर तो बरयाचदा ममा कडे शॉन अंकल ना भेटायचंय म्हणून हट्ट धरू लागला, म्हणून शेरॉन हि बऱ्याचदा शॉन ला शाळा सुटल्यावर सरप्राईस म्हणून रॉनला भेटायला घेणं जायची आपला एंजल अंकल ला बघून रॉन पण भलताच खुश व्हायचा. नंतर माईक कामातून परत येई पर्याय शेरॉन पण रिलॅक्स असायची. पण कामातून परतल्यावर माईक मित्रांसोबत दारूच्या गुत्त्यावर बसायचा आणि दारू पिऊन घरी धिंगाणा घालायचं , पुन्हा शिव्या, पुन्हा कोणाचे तरी नाव घेऊन शेरॉन वर संशय घ्यायचा . रात्रीची हि वेळ ते शेरॉन ऑफिस ला पोहोचेपर्यंत ची वेळ हि शेरॉन ची शापित वेळ असायची. पण एकदा ऑफिस ला पोहोचल्यावर शॉन चा चेहरा बघितला कि ती सगळं त्रास विसरून जायची.  
                 
शेरॉन ने एकदा विचार केला कि जर माईक ची शॉन बरोबर भेट घालून दिली तर माईक मध्ये थोडा फार पॉसिटीव्ह बदल होईल, म्हणून एकदा पैशांच्या मदतीचं निमित्त करून तिने माईक आणि शॉन ची भेट घालून दिली आणि खरंच शॉन च्या व्यतिमत्त्वाचं आणि वाईब चा प्रभाव माईकवर कि पडला . शॉन च्या पॉसिटीव्ह वाईब वर शेरॉन ला पूर्ण विश्वास होता. आणि झाले हि तसे माईक शहाण्यासारखा वागू लागला होता पण शॉन ला पूर्ण शंका होती कि माईक हा पुन्हा त्याच्या त्या वाटेवर जाणारच आणि झाले हि तसे. शेरॉन चे सारखे सारखे शॉन बद्दल  चांगले बोलणे, सतत त्याचे नाव घेणे माईक ला आवडेनासे झाले आणि मग झाले हि तसे, आत्ता  रोज रात्री माईक दारू पिऊन शेरॉन  चे नाव शॉन सोबत जोडून तिला शिव्यागाळ आणि मारहाण करू लागला . शॉन ला कळल्यावर त्याने माइकशी  बोलण्याचा निर्णय घेतला पण माझं नशीब म्हणून शेरॉन ने नकार दिला. पण याचा आपल्या नात्यावर काहीच परिणाम होणार नाही असे सांगितले .   

क्रमश:



4 comments:

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...