Special Duty of Parenting .... म्हणजे पालकत्व. हे एकदा सुरु झाल्यावर आपलं मूल झोपी जाणं हा खूप मोठा रिलीफ असतो आणि बाळाला झोपवणे हा खूप मोठा टास्क खरे तर आर्ट असतो, स्किल असते. प्रत्येक बाळाची आपली आपली एक स्वतंत्र स्टाईल असते झोपी जाण्याची, कोणी खांद्यावर थोपटल्याशिवाय झोपी जात नाही, कुणाला झुलवावे लागते, काहींना दुधाची बाटली लागते झोपताना, काही मुलं अंगाई ऐकत ऐकत झोपी जातात.
बऱ्याचदा बाळ झोपलय असे समजून आपण आपल्या कामाला लागणार तोच बाळ उठून हंगामा करू लागते, मग पुन्हा लागा झोपवायला !!
मला काय वाटतं. !!!
लहान मुलांना झोपवणे म्हणजे त्यांना त्यांच्या स्वप्नाच्या देशात सोडून देऊन येण्या सारखे आहे. लहानपणी नाही का आपले आई बाबा, आजी आजोबा आपल्याला शाळेत किंवा ट्युशन ला सोडून यायचे अगदी तसं .
जेव्हा तुम्ही बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करता तेव्हा एक कल्पना करा, तुम्ही बाळाला घेऊन जात आहात, ढगांवर बसून, मजल दरमजल करत, आजू बाजूला शीळ घालणारे पक्षांचे थवे. नदी नाले ओढे पार करत. आणि मग एके ठिकाणी घुरांमध्ये घुसून खूप सारे प्रकाशकिरण समोर दिसत आहेत, आणि मग सुरेख असे पियानोचं मंद संगीत कानावर पडत आहेत, थोड्या वेळाने एक सोनेरी चमचमता गेट समोर दिसतोय, गेट जवळ जाताच दिसतंय कि त्यावर एक पाटी आहे ज्यावर लिहिलंय 'Welcome to Dreamland' आणि खाली लिहिलंय Adults Not Allowed.
आपण पोहोचताच एक छोटीशी परी येते आणि बाळाचं हात घरून त्या स्वप्नांच्या देशा घेऊन जाते. बाळाला तेथे त्याचे हवे ते सवंगडी मिळालेले असतात शिनचॅन, मिकी , अलादिन , डेव्ह अँड इव्हा , छोटा भीम , माइटी राजू, तेथे घसरगुंडी असते , झोपाळा असतो, चॉकलेट चा बांगला असतो, झाडांवर आईस्क्रिम लागलेले आहेत, आणि बाळ त्या सगळ्यांत खेळण्यात मग्न झालेलं .
नॉक नॉक !!! तुम्ही बाहेर या, भानावर या, लेट देम एन्जॉय. कारण थोड्यावेळाने काय होणार आहे माहित आहे??
बाळ Dreamland मध्ये खेळून थकणार आहे. बाळ Deramland मध्ये ठाकणार म्हणजे तो झोपेतून जागा होणार आहे, फुल्ली चार्ज्ड अप होऊन... मग काय हंगामा वन्स अगेन.
पण कल्पना जरूर करा.
आपला अभि
No comments:
Post a Comment