Monday, March 30, 2020

PART 3 : Sharon आणि Shown

शेरॉन च्या वागण्यातला बदल शॉन ला समजत होता खटकत होता, पण शॉन काहीच करू शकत नव्हता, काही  दिवसांनी काही कारणांमुळे शेरॉन ला  नोकरी सोडून द्यावी लागली,  नोकरी सुटल्यामुळे शेरॉन घरीच होती, माईकचा  तुटपुंज्या पगारावर घर चालवायचा  मोठा प्रश्न तिच्या समोर होता. शॉन तिला मदत करायला तयार होता त्याला वाटले आत्ता तरी त्या दोघांना जास्त वेळ मिळेल, आलेला दुरावा मिटेल, मात्र झालेच उलटेच शेरॉन त्याला कधीतरी फोन करायची , कधीतरी भेटायची,  विचारल्यावर माईक आपल्यावर नजर ठेऊन आहे असे सांगायची . 

सगळं शॉन च्या सहन शक्ती पलीकडे चालले होते. पण त्याने आधीच वेट अँड  वॉच  ची भूमिका घेतली होते, म्हणजे आत्ता जे होईल ते होईल, शॉन चा एक मित्र होता रोहित ज्याला शॉन सगळे काही सांगत असे, य सगळ्या वरून  एकच  निष्कर्ष कडून रोहित ने शॉन ला सांगितले होते कि तुमचे रिलेशन फार काळ टिकणार  नाही, रोहित आधी पासूनच शेरॉन बद्दल नकारात्मक विचारांचा होता, रोहित च्या व्यतिरिक्त कंपनीतील इतर सहकारी ज्यांनी वेळो वेळी शॉन ला समजावले होते, आणि शॉन ने मात्र ह्या सर्वांकडे दुर्लक्ष्य केले होते, परंतु आज त्याला या सर्वांचे एक एक शब्द आठवत होते. पण नाते  संपवण्या पेक्ष्या आत्ता शॉन ने बघ्याची भूमिका घेण्याचे ठरवले होते. 

शेरॉन आणि शॉन चे नाते आत्ता व्हेंटिलेटर वर होते, कृत्रिम श्वासावर. आत्ता कोणतेही कारण श्वास तुटायला पुरेसे होते आणि झालेही तसेच. शॉन ने माईक ला पाठवलेल्या एका क्षुल्लकश्या व्हाट्स अप मेसेज वरून शेरॉन ने शॉन बरोबर भांडण उरकून काढले आणि तिने त्याला निर्वाणीचे सांगितले आत्तापासून तू मला फोन नको करुस, तू मला जितकी पैशांची मदत केलीस ते मी परत करणार आहे. 

काही नाती ज्यांना काही नाव नसते ती खुलं कॉम्प्लिकेटेड असतात, निभावणे शक्य नसतात अश्या नात्यांचा असाच शेवट अपेक्षित असतो. खरे तर समोरची व्यक्ती आमच्या कमिटमेंट्स पळत नसेल, तुम्हाला वेळ देत नसेल तर समजून जा यु आर ऑन  रॉंग ट्रॅक . प्रॅक्टिकल होणे गरजेचं असते . शेरॉन ला दोष नाही देता येणार कारण समोरच्याचे इंटेंशन्स तुम्हाला समाजात नसतील तर तो तुमचा दोष आहे.     

समाप्त 

आपला अभि 



2 comments:

  1. Pan ti sheron ase ka vagli te nahi lihilas...aani aadhi ti tyala time det hot hoti..mag tyala kas samjel ki to wrong track var aahe

    ReplyDelete
  2. asatil tichi kahi karane,, kinva intintions vait asatil

    ReplyDelete

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...