हॅलो ऑल,
काल २२ मार्च जनता कर्फ्यू सफल केल्या नंतर आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात १४४ कलाम लागू झाले आहे, या नुसार कमीत कमी ३१ मार्च पर्यंत आपण सगळे घरीच आहोत, Compulsorily. दळणवळणांची सारी सरकारी साधने बंद असणार आहेत, खाजगी वाहनांना सुद्धा मज्जाव असणार आहे, जमावबंदी असणार आहे. थोडी फार दुकाने खुली ठेवण्याची परवानगी आहे.
पण तो पर्यंत घरी राहणे अनिवार्य आहे ...
अब तेरा क्या होगा कालिया... !!!
नो फिकर ... आपल्याकडे आहेत ना काही आयडिया ची कल्पना .
वर्किंग लोकांनी नक्कीच त्यांचे वर्क फ्रॉम होम चे होम वर्क घरी आणले असणार अगदी गाठोडे भरून. पण तुम्हाला सांगू का ९५% लोकांकडून हा प्रकार कधीच सफल होत नाही (I am one of them) ट्रस्ट मी.
पण एक सांगू का ऑफिस ची कामे तर आयुष्यभर होताच राहणार आहेत. हि एक नामी संधी मिळालीय स्वतःला शोधण्याची , rejuvanet करण्याची, ज्या गोष्टींसाठी वेळ नाही अशी करणे आपण देत असतो (फक्त इनडोअर) त्या सर्व गोष्टी करण्याची. लेट्स सी आपण काय करू शकतो घरी राहून.
घरकाम : घरकाम करणारी असेल तर त्या मावशीला सुट्टी देऊन टाका, precaution म्हणून तरी आणि स्वतः घर काम करा, आईला, बायकोला मदत करा.
व्यायाम : ह्या गोष्टींचा दिवस कधीच उजडत नाही, उद्यापासून/ सोमवारपासून/ एकतारखेपासून सगळे एक्सक्युजेस (स्वानुभवावरून सांगतोय). घ्या मारायला आत्ता सूर्यनमस्कार, ऍब्स , स्क्वाट्स, स्ट्रेचिंग, होऊन जाऊद्या .
बॉडी Detoxing : बॉडी Detoxing म्हणजे शरीरातील विषारी मूलद्रव्ये शरीरातूल घालवून देणे, You Tube वर त्या बद्दल बराच काही आहे, पण मी केलेले सांगतो; लिंबू, आले स्लाइस करून घ्या, पुदिन्याची पाने घ्या दालचिनी घ्या, हे रात्रभर पाण्यात ठेवा आणि शक्यतो तेच पाणी दिवसभर घ्या. तांब्याच्या भांड्यातील पाणी उत्तम (अल्कलीन वॉटर म्हणतात त्याला). तेलकट खाण्यावर थोडा ताबा ठेवा Thats it !!
माईंड Detoxing : शरीराप्रमाणे मनाला सुद्धा detoxification ची गरज आहे. तर मग सुरु करा प्राणायाम,अनुलोम विलोम, शिरसासन आणि बराच काही, You Tube आहे ना गाईड करायला. जर जवळपास चांगले आयुर्वेदिक क्लिनिक असेल तर I अडवाईस गो फॉर पंचकर्म.
प्लांटेशन : वृक्ष संवर्धन करा, घरात नवीन रोपटी लावा, जुनी काढा, खतपाणी करा, घरातल्या रोपट्यांना संगीत ऐकवा , मी सुध्दा तुळस लावलीय घरात, आणि रोज म्युजिक ऐकवतो .
Re - Structuring : घरातल्या वस्तू इकडे तिकडे करा, पण व्यवस्थित पणे, म्हणजे सोफा हलवा, शोपीस ची जागा बदला, भिंतींवर टांगलेल्या शोपीस ची जागा बदल.
डिजिटल सोशलिझशन : बी ऍक्टिव्ह ऑन FB , Insta , व्हाट्सएप (मी नोकरी .कॉम आणि लिंक्ड इन वर जास्त ऍक्टिव्ह आहे आत्त्ता 😁 ), Tik Tok वर विडिओ बनवा मला फॉलो करा @abhishek_२८may वर (like करा viral करा )
वेब सिरीज : मी पण कोणे एके काळी Netflixitian होतो (हा वर्ड माझ्याकडून इंग्लिश शब्दकोषाला बहाल), या व्यतिरिक्त ऍमेझॉन प्राईम आहे, जोश्यांचा स्वप्नील Mx प्लेअर वर 'समांतर' नावाची वेब सिरीज घेऊन आलाय, या सर्व ऍप्स वर अनेक भाषिक सिरीज, मुव्हीज, आहेत. (Sacred Games ३ येत आहे म्हणे ), करिष्मा कपूर ची नवीन Mentalhood पण मस्तच ALT बालाजी वर. घरात लहान मुले असतील तर Alt बालाजी, उल्लू असे ऍप्स थोडे रीस्की आहेत, चाईल्ड फिल्टर आहेत का बघा, हॉटस्टार, Voot आणि बरेच ऍप्स आहेत. या ऍप्स चे मंथली सुब्स्क्रिप्शन पण कमी आहेत.
या व्यतिरिक्त काही असेल तर कंमेंट मध्ये नक्की कळवा आपण याच्या दुसऱ्या भागात पब्लिश करूया.
तोवर टाटा बाय बाय !!
जाता जाता :
Uber चा ड्राइवर पावसात भिजला तर Ola होतो.
आपला अभि.
No comments:
Post a Comment