Saturday, March 21, 2020

Janata Curfew

हॅलो ऑल,

पहिला ऑफिशिअल ब्लॉग, म्हणतात आपण आपल्या भावना आपल्या मातृभाषेत व्यवस्थित मांडू शकतो, म्हणून हा खटाटोप  (पण टाईप करणे कठीण आहे राव, सगळा कीबोर्ड चा खेळ, जमेल हळू हळू)

आजचा ऑफिशिअली पहिला ब्लॉग कॉरोनला समर्पित..... 

ट्रम्प तात्यांनी करोनाला Chinese Virus  म्हणून हिणवले आहे, I Support ट्रम्प तात्या, हा virus चीन ने जगाला दिला. काही कारण नसताना, वेळीच प्रतिबंध केला असता तर अक्ख्या जगावर हि वेळ आलीच नसती. काहीही खातात वटवाघूळ, मांजर, कुत्रे, उंदीर, साप, झुरळ, बेडूक यॅक्क !!! खाल्ले चीन ने आणि हात सगळं जग धूतय.  

हे कोरोना प्रकरण संपल्यावर म्हणे आपल्या काही गृहिणी चीनला भेट देऊन त्यांना वरण भाताचा कुकर कसा लावायचा ते शिकवणार आहेत !!!! (बस्स त्यांनी डोळे उघडे ठेऊन शिका  म्हणावं )

कोरोना भारतात घुसल्यानंतर, प्रधानमंत्री मोदी यांनी जनता कर्फ्यू घोषित केला.  आज तो सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत राहणार आहे. आत्ता आपण सगळेच घरी आहोत आप आपल्या परीने कोरोना विरुद्ध असलेल्या युद्धाला तोंड देत आहोत. हा कर्फ्यू अंशतः ३१ मार्च पर्यंत चालू असेल. शक्यतो सर्वांनी घरी राहा, बेसिक हायजिन पाळा. स्वतःची  व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या. गरज नसेल तर उगाचच बाहेर पडू नका. 

व्हाट्स अप वरचे करोना वरचे जोक्स आणि मिम्स एन्जॉय करा. 

अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि कन्फर्म नसल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. 

बाकी हीच इच्छा , करोना गो  !! गो करोना  !!!!!

  
जाता जाता एक लपलेले सत्य उलगडतो:
मॅग्गी कधीच २ मिनिटांत बनत नाही 

तुमचा अभि 

  

4 comments:

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...