Thursday, April 30, 2020

१२ जुलै १९७५ : भाग पाचवा - शेवट

२२ जुलै १९७५

खून्याला पकडले होते, आणि खुन्यानेही खुन्याची कबुली दिली होती, पण अजूनही खुन्याला रिमांड मध्ये टाकले नव्हते कारण स्टेटमेंट घेणे चालू होते. 

शिंदे आणि इनामदार केबिन मध्ये बसून बोलत होते. 

"साहेब, कसे कळले ?" 

"काय?"        

"हेच कि रावसाहेबांची मुलगी निशा हीच खरी खुनी आहे " शिंदे,

निशाचेच स्टेटमेंट घेणे चालू होते. 

"खरेतर खुनाच्या दिवशी स्टडीरूममध्ये असणारी  निशाची अनुपस्थिती आपण दुर्लक्षित केली हि आपली चूक होती आणि  निशा हि एक मानसिक रुग्ण आहे हे समजून आपण तिला बेनिफिट ऑफ डाउट दिला हि आपली  दुसरी घोडचुक होती, पोस्टमॉर्टेम मध्ये सांगितल्या प्रमाणे रावसाहेबांच्या रक्तात मिळालेल्या झोपेच्या गोळ्यांचे अंश हे  निशा घेणाऱ्या झोपेच्या गोळ्यांचे होते ."

"मग हे जोशींनी का नाही सांगितले ?"   

"कारण जोशी  हे निशाचे डॉक्टर नाहीत, तिची ट्रीटमेंट मानसोपचारतज्ज्ञ करीत होते."

आपल्या आईने केलेल्या आत्महत्येला आपले वडीलच जबाबदार आहेत अशी तिची मानसिकता होती म्हणूनच तिने हे पाऊल  उचलले.  तो दिवस म्हणजे  १२ जुलै हि निशाच्या आईने केलेला आत्महत्येचा दिवस होता आणि त्याच दिवशी निशाने आपल्या वडिलांना मारून आईच्या आत्महत्येचा बदला घेतला.  आयुष्यात काहीच भविष्य नसणाऱ्या निशाचं एकच ध्येय होतं, ते म्हणजे रावसाहेबांना आपल्या हाताने मारणे, म्हणूनच त्या रात्री तीने त्यांच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या  टाकल्या आणि त्या झोपेतच त्यांना गळा आवळून मारून टाकले. राजवर्धनच्या खुनाची कबुलीहि  निशाने  पोलिसांना स्टेटमेंट दरम्यान दिले होते. 

"पण साहेब,  निशाच खुनी असेल हि खात्री तुम्हाला कधी आणि कशी झाली " शिंदेंनी कुतूहलाने विचारले

"शोकसभेच्या दिवशी तिला जेव्हा निशाला जेवणाच्या पंक्ती मध्ये बघितले तेव्हा,.....  ती डाव्या हाताने जेवत होती, निशा डावखुरी आहे हे तेव्हाच समजले" 

"ओह्ह ... पण मग आत्ता  पुढे ?" 

"निशा एक मानसिक रुग्ण आहे, आणि तिचा भाऊ हा स्वतः एक मोठा वकील आहे, तो जरी तिला कायद्यापासून वाचवू शकला नाही तरी शिक्षेपासून सहजच वाचवू शकतो. "

हेच.....  अगदी हेच हर्षवर्धनच्या मनात आले होते त्याला एकाच दगडात त्याला अनेक पक्षी मारायचे होते , आणि त्याने प्लॅन हि तसाच बनवला; त्यात त्याला त्याच्या आईच्या बदल्याचेही समाधान मिळणार होते, राजवर्धनचा काटा काढून आणि निशाला मानसिक रुग्ण असलेला कैदी बनवून  त्याला रावसाहेबांची संपूर्ण संपत्ती मिळणार होती राहता राहिल्या नलिनीबाई, त्यांचे आणि जोशींचे प्रकरण काढून त्यांना वारसदार म्हणून कसे नालायक ठरवायचे हे हर्षवर्धनला चांगलेच माहित होते .

प्लॅन यशस्वी व्हावा म्हणून हर्षवर्धनाने आपल्या बहिणीचा निशाचा आणि नोकर किसनचा वापर करून घेतला, हर्ष स्वतः एक उत्तम वकील आणि वाकपटु असल्यामुळे त्याला या दोघांना आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेणे सोपे गेले. 

किसनाचा वापर त्याने राजवर्धनाला मारण्यासाठी केला. किसन रावसाहेबांचा विश्वासू नोकर होता त्यामुळे त्याने त्यांना त्रास देणाऱ्या राजवर्धनविरुद्ध हर्षवर्धनाला मदत केली, रात्री उशीरा भर पावसात जाऊन किसन ने बागेतच खड्डा खणला, दारूच्या नशेत चूर असणाऱ्या राजवर्धनला तिथे आणणे कठीण नव्हते, हर्षवर्धनच त्याला तिथे घेऊन आला. आणि लोखंडींसळीने जोराने त्याच्या डोक्यात घाव घालू लागला, तो मेल्याची खात्री करून त्याला पुरून किसन आणि हर्षवर्धन परतले होते, किसनचा  रोल फक्त राजवर्धनच्या खुनापर्यंत होता, आणि हर्षवर्धनने त्याला  त्याचा मोबदला हि दिला होता . 

रावसाहेबांच्या खुनासाठी हर्षवर्धनाने १२ जुलै पर्यंत मुद्दाम वाट बघितली, कारण हा खून मुद्दाम निशाच्या हातून  घडवून  तिला त्याचे समाधान द्यायचे होते, आणि जरी पुढे मागे निशा पकडली गेलीच तर तिच्या कडून रावसाहेब आणि राजवर्धनच्या दोघांच्या खुन्याची कबुली देऊन तिला कायद्याच्या कचाट्यातून कसे सोडवायचे हे हर्षवर्धनाला चांगलेच माहिती होते, आणि याचाच हर्षवर्धनाने फायदा करून घेतला. आपला बदला  आणि भावावरचा विश्वास यामुळे निशाही  हे सगळे करायला तयार झाली. 

एकंदरीतच नात्यांपुढे बदला, पैसा आणि संपत्ती यांना विजय मिळाला होता. पैसे आणि प्रसिद्धीची नशा माणसाला काहीहि  पडते.  कोण चूक कोण बरोबर यापेक्षा कायद्याच्या पळवाटा कुठून निघून कुठे पोहोचतील आणि याचा शेवट कसा ठरावा याचा काही नेम नसतो. 

समाप्त 

विशेष आभार : मोहित शुक्ला ज्याने  प्रत्येक भाग लिहिताना माझ्यासोबत विचारविनिमय केल्याबद्दल आणि छाया ढिलपे ज्यांनी माझ्या लिखाणाच्या चुका दुरुस्त करून आणखी शास्त्रशुद्ध कसे लिहावे याचे मार्गदर्शन केल्याबद्दल. आभार सर्व वाचकांचे !!

धन्यवाद  !!!  
  
कळावे, 
लोभ असावा

आपला अभि,  

Tuesday, April 28, 2020

१२ जुलै १९७५ : भाग चौथा - नजरभेट

२१ जुलै १९७५

खुनावरचं सावट आणखीनच वाढलं होतं, रोज वर्तमानपत्रांमध्ये पोलिसांच्या कामाच्या ढिलाईबद्दल लिहून येत होतं, वरिष्ठांचा दबाव सतत इनामदारांवर वाढत चालला होता. राजवर्धन च्या मृतदेहावरून आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वरून एवढं स्पष्ट होत होते कि राजवर्धनचा खून इनामदारांच्याहि खुनाच्या ३ दिवस आधी झाला होता, राजवर्धनचा खून डोक्यात दगड घालून करण्यात आला होता.  त्याला जमिनीत पुरण्यात आले होते. खतासाठी खड्डा खणताना रामसेवकला राजवर्धनची बॉडी सापडली होती. राजवर्धनची माहिती फक्त नलिनीबाईंना असल्याने घरातील इतरांवर संशय येत नव्हता. नलिनी बाईंनी पती आणि मुलगा दोन्ही गमावल्याने त्या संशयितांमध्ये आत्ता येत नव्हत्या.

डॉ. जोशी हे देखील डावखुरे होते, पण जेव्हा खून झाला तेव्हा ते तिथे उपस्थित नव्हते. रावसाहेबांच्या व्हिस्की मध्ये टाकलेल्या झोपेच्या गोळ्या आणि डॉ जोशींनी रावसाहेबांना  लिहून दिलेल्या गोळ्या या वेगळ्या होत्या. म्हणजेच खुन्याने वापरलेल्या गोळ्या वेगळ्याच होत्या, एका बाजूने हे जरी मानले कि डॉ जोशी आणि नलिनीबाई यांचे काही संबंध असले तरी डॉ जोशी एवढी मोठी रिस्क घेणार नाहीत.  

दुसऱ्या दिवशी देशमुख कुटुंबीयांनी रावसाहेब आणि राजवर्धन यांच्यासाठी ठेवलेल्या शोकसभेत इनामदारांना उपस्थित राहायचे होते. पोलीस ड्युटी म्हणून आणि एक जुने ओळखीचे स्नेही म्हणूनही. रावसाहेब सोडले  तर त्यांच्या कुटुंबियांसोबत इनामदाराची फारशी ओळख नव्हती. हर्षवर्धन जरी एक चांगला वकील असला तरी त्याने वकिली क्षेत्रामध्ये इतकेही पाय रोवले नव्हते कि एका पोलीस अधीक्षकाबरोबर त्याचे उठणे बसणे व्हावे. रावसाहेबांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती होती, पण जोवर खुनी सापडत नाही तोंवर इनामदार स्वस्थ बसणार नव्हते. इतके दिवस रावसाहेबांनी हाताळलेल्या आणि  जिंकलेल्या केसेस, त्यातून असणारे शत्रू, ही शक्यताही नाकारता येत नव्हती, परंतु त्यापैकी कोणीही त्यादिवशी घटनास्थळाच्या आसपासही नव्हते.

२२ जुलै १९७५

इनामदार रावसाहेबांच्या शोकसभेला हजर होते. अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित होती म्हणून  त्यांचे सहकारी जातीने व्यवस्था बघत होते. अनेकांची भाषणे झाली, रावसाहेबांबद्दलचे आपले अनुभव बोलून  दाखवले, शोकसभेला जे अपेक्षित असते ते सगळे बोलून झाले होते, सभा संपली होती. शोकसभेनंतर भोजनाचा कार्यक्रम सुरु झाला, हळू हळू कार्यक्रम संपत आला, रावसाहेब हे स्वतः मोठे व्यक्तिमत्त्व होते म्हणूच त्यांच्या शोकसभेला अनेक मंडळी  उपस्थित होती, शेवटच्या पंगतीमध्ये रावसाहेबांचे अचानक लक्ष गेले ... आणि !!!

त्या पंक्ती मध्ये खुनी सापडला !!!

आपण हि शक्यता दुर्लक्षित कशी केली  ???? इनामदारांना  वाटू लागले

शोकसभेनंतर इनामदार आणि सहकारी स्टेशनला पोहोचले, इनामदारांनी गेल्या गेल्या कमिशनर साहेबांना  फोन  लावला आणि त्यांना सविस्तार वृत्तांत दिला

"आर यु शुअर ??" कमिशनर

"यस सर !! " इनामदार

"यु शुड री -इंटरोगेट " कमिशनर

"नो नीड सर, धिस इस कन्फर्म " इनामदार

"ओके देन, फॉलो द प्रोटोकॉल, मेक इट टुमॉरो  मॉर्निंग " असे म्हणून कमिशनर साहेबांनी फोन ठेवला.

इनामदार   सकाळची आतुरतेने वाट पाहू लागले.

क्रमशः

Monday, April 27, 2020

१२ जुलै १९७५ : भाग तिसरा - पोस्टमॉर्टेम, पुरावे आणि .......... !!!

 १७ जुलै १९७५

इनामदार आणि सहकाऱ्यांची कार्यचक्रे जोरात सुरु झाली. मिळालेले पुरावे कोणत्या दिशेला अंगुलीनिर्देश करीत  आहेत आणि आपली दिशा बरोबर आहे का यावर खल चालू होता.

"साहेब", - हवालदार,  "आत येऊ का ?"

इनामदारांनी खुणेनेच आत बोलावले, हवालदार एक पाकीट देऊन गेला, पाकीट  पाहून इनामदारांचे डोळे चमकले, हॉस्पिटल मधून आलेला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट होता, इनामदारांनी तातडीने टीम ची महत्वाची बैठक बोलावली. 

पोस्टमॉर्टेम रिपोर्ट नुसार रावसाहेबांना झोपेच्या गोळ्या देऊन मग त्यांचा गळा घोटण्यात आला होता त्यांच्या रक्तामध्ये काही अंशापर्यंत अल्कोहोलचे प्रमाणहि सापडले होते. 

आत्ता, काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागला होता, एक म्हणजे अल्कोहोल, रावसाहेबांचा  दिवसाचा फक्त एका पेगचाच कोटा होता हे सर्वांना ठाऊक होते, म्हणजेच घटनास्थळी भरलेला ग्लास हि खुन्याची दिशाभूल करण्यासाठीची  एक चूक होती. खून झाला ती जागा म्हणजे रावसाहेबांची स्टडीरूम व्यवस्थित टापटीप होती, काहीच विस्कटले नव्हते म्हणजेच खून स्टडीरूम मध्ये झालाच नव्हता, कुठे तरी दुसऱ्याच ठिकाणी खून करून त्यांना स्टडीरूम मध्ये आणले होते. ज्याने कोणी खून केला तो कोणी सराईत गुन्हेगार नव्हताच कारण इतक्या चुका त्याने केल्या होत्या, पण एक हुशारी मात्र खुन्याने दाखवली होती ती म्हणजे कुठेही हाताच्या ठश्यांचे  निशाण नव्हते. 

"सर, जरी हे खरे असले तरी एक खुनी कोण हे कसे समजणार ?"  - पो. नि. शिंदे 

"हम्म...  शिंदे या पोस्टमॉर्टेम मध्ये आणखी काही अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खुन्याच्या आणखी जवळ  घेऊन जातात ."  - इनामदार

"कोणत्या सर ?"

"गळ्यावर असणारे निशाण हे एकाच जागी स्थिर नाहीय, म्हणजे गळा  आवळण्याचा प्रयत्न दोनतीन  वेळा केला गेलाय, म्हणजे ट्राय, कन्फर्म, फेल, ट्राय बेसिस वर "

"म्हणजे ?"

इनामदार "गळा  घोटून बघितल्यावर पाहिले, श्वास चालू आहे, मग पुन्हा घोटला, कन्फर्म होई पर्यंत प्रयत्न केले गेले, दुसरी गोष्ट गळा घोटण्यासाठी रस्सी किंवा बेल्टचा वापर केला गेला नाही, कारण असे कोणतेच निशाण नाहीत, आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट"

"कोणती सर?"

"खुन्याने ज्या पद्धतीने गळा घोटला  त्यावरून खुनी हा डावखुरा आहे " - इनामदार 

इनामदार जसे बोलले तसे लगेच इं. पाटीलचे डोळे चमकले, "सर, खुनी सापडलाय !!!"

"कोण?" पो. नि  शिंदे 

"राजवर्धन रावसाहेब देशमुख " - इं.  पाटील, "राजवर्धन हा डावखुरा आहे सर"

"तुम्हाला कसे माहित?" इनामदार 

"सर, राजवर्धनला ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या केस मध्ये अरेस्ट झाली होती, मीच अटक केली होती त्याला, पण रावसाहेबांनी केस दाबून टाकली होती". 

केस सुटली होती!!! खुनी कोण हे कळले होते, इनामदारांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या रेषा उमटल्या होत्या, आत्ता  फक्त मिळालेल्या पुराव्यानुसार राजवर्धनाला अटक करून त्याला बोलते करायचे होते      

"गुड जॉब पाटील !! "  - इनामदार 
" शिंदे, वॉरंट काढून घ्या  लवकर, आणि राजवर्धन आत्ता  जिथे असेल त्याला अटक करा !!"

"साहेब, आत येऊ का?" -  हवालदार कदमने दरवाजा ठोठावला  

"काय झाले?" इनामदार

"साहेब, रावसाहेबांच्या वाड्यावरून फोन आला होता आत्ताच " कदम 

"कोणाचा ?" 

"रावसाहेबांचा नोकर किसन, त्यांच्या  माळ्याला, रामसेवकला, आज सकाळी बागेत खोदकाम करताना जमिनीत पुरलेली बॉडी सापडली"

"कोणाची बॉडी काही समजले का ?"      

"राजवर्धन देशमुख ची  !!!"

"काय !!"

क्रमशः    

Saturday, April 25, 2020

१२ जुलै १९७५ : भाग दुसरा - खून कोणी केला?

तारीख : १४ जुलै १९७५
स्थळ : शिवाजीनगर पोलिस स्टेशन
वेळ : सकाळ १० वाजून ३० मिनिटे

पो. नि. शिंदे, इन्स्पेक्टर पाटील, हवालदार सुर्वे आणि हवालदार कदम हि टीम गेले चोवीस तास रावसाहेब केसवर काम करत होती. त्यांनी केस बद्दलचा आपला अहवाल इनामदारांसमोर सादर केला. रावसाहेबांच्या घरी स्वतः रावसाहेब सोडून ज्या इतर व्यक्ती होत्या त्या म्हणजे रावसाहेबांची पत्नी नलिनी, मोठा मुलगा हर्षवर्धन म्हणजेच हर्ष, मुलगी निशा, तिसरा मुलगा राजवर्धन म्हणजेच राज, हर्ष ची पत्नी मेघना, हर्ष आणि मेघनाचा पाच वर्षांचा मुलगा कबीर यांव्यतिरिक्त घरातील नोकर माणसं  म्हणजे बंगल्याचे पूर्णवेळ नोकर किसन आणि सखु, बगिच्याचा माळी रामसेवक आणि बंगला, बगीचा आणि रावसाहेबांचा इतर जवळपासच्या मालमत्तेचा रखवालदार चरणसिंग. आजवर इनामदारांना  रावसाहेबांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण टीम ने जमवलेल्या माहितीमुळे रावसाहेबांचे डोके चक्रावून गेले, कारण मिळालेल्या माहिती नुसार जवळ जवळ  हे सगळेच संशयित होते, रावसाहेबांनी एक एक संशयिताची माहिती पुन्हा एकदा वाचायला सुरुवात केली .

संशयित क्रमांक एक : नलिनी रावसाहेब देशमुख
नलिनी हि रावसाहेबांची दुसरी पत्नी, रावसाहेबांच्या पहिल्या पत्नीने म्हणजे जानकी बाईंनी बावीस वर्षांपूर्वीच आत्महत्या केली होती, हर्ष  आणि निशा हे दोघे जानकी आणि रावसाहेब यांची अपत्ये, ज्यावेळी जानकी बाईंनी आत्महत्या केली तेव्हा हर्ष दहा आणि निशा सात वर्षांची होती, असे म्हणतात जानकीबाईंच्या आत्महत्येमागे राबवसाहेब आणि नलिनी यांचे प्रेमसंबंधच कारणीभूत होते, आणि झाले हि असेच, जानकीबाई गेल्या नंतर वर्षभरातच रावसाहेबांनी नलिनीबरोबर लग्न केले. असेही म्हणतात लग्नानंतरहि नलिनी रावसाहेबांबरोबर एकनिष्ठ नव्हत्या, पण रावसाहेंबांच्या डोळ्यांवरची अंध-विश्वासाची पट्टी कोणी काढू शकले नाही. रावसाहेबांच्या इस्टेटीपैकी मोठा हिस्सा आपल्याला आणि आपल्या मुलाला मिळावा अशी त्यांची इच्छा असू शकते म्हणून नलिनी प्रमुख संशयित होत. 


संशयित क्रमांक दोन : राजवर्धन रावसाहेब देशमुख
राज  हा रावसाहेबांचा तिसरा मुलगा, म्हणजेच रावसाहेब आणि नलिनी यांचा मुलगा, रावसाहेबांचे कोणतेच गुण राज  मध्ये नव्हते. लहानपणापासून मोठ्या घराण्याचा एक वारसदार अशीच भावना मनात असल्यामुळे आणि घरातला  सगळ्यात लहान म्हणून त्याच्या डोक्यात बरीच हवा होती, कॉलेजचे शिक्षण हि व्यवस्थित होत नव्हते आणि त्यातच त्याला सिगारेट आणि दारूचे व्यसन लागले होते. राज च्या रोजच्या कटकटींना वैतागून रावसाहेबांनी त्याला घरातून हाकलून दिले होते आणि त्यामुळेच राजच्या मनात आपल्या वडिलांबद्दल एक प्रकारे राग निर्माण झाला होता. नलिनी आपल्या मुलाला नेहमीच पाठीशी घालीत, त्याला बाहेर काढल्यानंतर हि राज चे सगळे व्यवस्थित चालावे म्हणून त्या वेळोवेळी त्याला हवे तितके पैसे पाठवीत. राज बरोबरच्या अश्या वर्तणुकीमुळे नलिनी बाईंना देखील रावसाहेबांचा राग आला होता. राज च्या अशाच वागणुकीमुळे तो हि एक संशयित होता. 


संशयित क्रमांक तीन : हर्षवर्धन रावसाहेब देशमुख
हर्ष वर संशय घेण्याचे कारणही तसेच होते, हर्ष ची बुद्धिमत्ता रावसाहेबांच्या तोडीस तोड होती तो हि वकील होता, त्याची प्रॅक्टिसहि जोरात चालू होती, पण आपल्या आईच्या आत्महत्येस तो रावसाहेबांना जबाबदार मनात होता. ज्या वेळेस जानकी बाईंनी स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते, त्यावेळेस घरात कोणी नव्हते पण सात वर्षांच्या निशाने हे सगळे आपल्या डोळ्यांनी पहिले होते, या गोष्टीचा निशाच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता, तिला मध्ये मधे मधे वेदाचे झटके येत, निशा पूर्ण वेडी नसली तरी तिचे आयुष्य सामान्य मुलींसारखे बिलकुल नव्हते निशाच्या या अवस्थेला देखील रावसाहेबच  जबाबदार आहेत म्हणूनच या गोष्टीचा संताप हर्ष च्या मनात खदखदत होता.

संशयित क्रमांक चार : मेघना हर्षवर्धन देशमुख 
रावसाहेबांच्या मनाविरुद्ध हर्ष ने प्रेमविवाह केला होता, मेघनाहि हर्ष ची क्लासमेट होती, एका सामान्य घरातून असल्यामुळे रावसाहेब या लग्नाविरुद्ध होते पण दुसरा पर्यायच नसल्यानं त्यांनी लग्नाला परवानगी दिली होती, पण रूढीवादी विचारांच्या रावसाहेबांनी मात्र सुनेला प्रॅक्टिस करायची परवानगी दिली नाही. हर्षहि वडिलोपार्जित इस्टेटच्या हव्यासापोटी काही बोलला नाही. मात्र हे सगळे लग्न झाल्यावर घडल्यामुळे मेघनाचाही  रावसाहेबांवर राग होता. मेघना प्रमुख संशयित नसली तरी जोवर खरा आरोपी मिळत नाही तोवर मेघनालाहि संशयित म्हणूनच राहावे लागणार होते    

संशयित क्रमांक पाच  : माळी रामसेवक
किसन आणि सखू  हे रावसाहेबांचे जुने आणि विश्वासू नोकर होते, किसनच्या सांगण्यावरून हे कळाले  होते कि रामसेवक माळी याचा रावसाहेबांवर राग होता, रामसेवक हा रावसाहेबांचा जुना माळी  शंकरचा मुलगा होता. शंकरच्या मृत्यूनंतर रामसेवक स्वतः बागकामाची कामे करीत होता. रामसेवकाला खूप लवकर श्रीमंत व्हायचे होते, शॉर्टकट मध्ये, एकदोनदा घरात चोरी करताना पकडला देखील होता, परंतु शंकर च्या कामामुळे रावसाहेबांनी त्याला फक्त समज देऊन सोडला होता. रामसेवकाची निशावरहि वाईट नजर होती, परंतु तो तिच्यापर्यंत पोहचू  शकत नव्हता. "म्हाताऱ्याला मारून त्याच्या मुलीशी लग्न करेन आणि या घराचा मालक होईन" असे अनेकदा  तो किसनला दारूच्या नशेत म्हणाला होता. इनामदारांना  रामसेवक एवढे मोठे धाडस करेल असे वाटत नव्हते. 

संशयित क्रमांक सहा : डॉक्टर जोशी
सखूच्या सांगण्यावरून, रावसाहेबांचा डॉ जोशींवर खूप विश्वास होता, दोघांमध्ये दाट मैत्री होती पण जोशींच्या मनात काहीतरी वेगळेच असायचे, नेहमी  रावसाहेबांना भेटण्याआधी ते नलीनीला त्यांच्या बेडरूम मध्ये भेटायला जायचे. नालीनि देखील बरयाचदा त्यांच्या क्लिनिक मध्ये भेटीला जायच्या. घटनेच्या दिवशीहि डॉ जोशी आणि रावसाहेबांचे वकील उपाध्याय सात वाजता भेटायला आले होते, उपाध्याय लवकर निघून गेले पण जोशी मात्र तेथेच होते,  रावसाहेबांच्या मृत्यूच्या अर्धा तास आधी जोशी निघून गेले होते. जेव्हा घरच्यांनी रावसाहेबांची अवस्था बघितली तेव्हा त्यांनी डॉक्टरांना तात्काळ बोलावून घेतले. जोशींची हि वर्तणूक त्यांना प्रमुख आरोपी म्हणून सिद्ध करत होती पण सबळ पुरावा असा काहीच नव्हता.                
इनामदारांनी संशयितांची फाईल बाजूला ठेवली आणि त्यांची विचारचक्रे सुरु झाली, केस हाय प्रोफाईल होती, कोणतही चुकीचं  पाऊल अंगाशी येऊ शकतं. घरातल्या सगळ्यांना केस संपेपर्यंत विनापरवानगी शहर सोडून जाण्याबाबत मनाई करण्यात आली. सर्व संशयितांपैकी कोणीही खरा आरोपी असू शकतो किंवा कोणीही नसू शकतो आत्ता ते पुरावा हाती लागेपर्यंत सांगणे अशक्य होते. सगळ्यांचे हेतू जरी वेग वेगळे असले तरी कोणी एकानेच आपला हेतू अमलात आणलाय हेच खरे होते. शेवटी पैसा, अहंकार, वासना आणि बदला या गोष्टी माणसाला प्रत्येक नात्यापासून वेगळ्या ठेवतात, आणि त्याची नाशा  चढली कि माणूस कुठल्याही थराला जातो. 

पण मग या खुन्या मागचा नेमका हेतू काय?? 

पैसा??   अहंकार ????   वासना   कि बदला ???

क्रमशः                 
           

Friday, April 24, 2020

१२ जुलै १९७५ : भाग पहिला - खून

दिनांक : १२ जुलै १९७५
वेळ : रात्रीचे  ९ वाजून ३० मिनिटे 
स्थळ : शिवाजीनगर पोलीस चौकी  

ट्रिंग ट्रिंग .... पोलीस स्टेशनमधल्या टेबलावरचा फोन,....  "हॅलो, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, येस,  एस पी  इनामदार  बोलतोय बोला ....... व्हॉट, ओह माय गॉड !! !!!! ....... आम्ही पोहोचतोच पण तुम्ही कुठेही हात लावू नका". फोन ठेऊन देऊन इनामदार उठले. इनामदार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक होते, त्यांच्याकडे थेट फोन येण्यामागे तसेच कारणही  होते. निरीक्षक, उपनिरिक्षक आणि दोन हवालदार अशा पाच  जणांची तुकडी घेऊन इनामदार पटकन निघाले. त्यांना लवकरात लवकर पोहोचायचं होतं, कारणही तसंच होतं, शहरातल्या नामी श्रीमंत अशा रावसाहेबांच्या बंगल्यावरून फोनआला होता . 

रावसाहेबांचा खून झाला होता .... 
    
पावसाळ्याचे दिवस होते, बाहेर जोराचा पाऊस पडत होता, दहाच्या सुमारास इनामदार आणि त्यांची टीम रावसाहेबांच्या बंगल्यावर पोहोचले होती, दारातच बंगल्याचा गडी उभा होता, तोच या सर्व पोलिसांना सरळ राबसाहेबांच्या स्टडीरूम मध्ये घेऊन गेला. इनामदार आत गेले आत मध्ये रावसाहेबांचा मुलगा, सून आणि बायको होती. त्यांची बायको रडत होती, सून सांत्वन करत होती, त्यांचा मुलगा डॉक्टरांबरोबर बसला होता, पोलिसांना पाहून सगळे उभे राहिले, इनामदारांनी डॉक्टर सोडून सगळ्यांना बाहेर जाण्याची सूचना केली आणि  प्रकारची पाहणी करण्यास सुरुवात केली. रावसाहेबांची स्टडी रूम बरीच भव्य होती, असणारच कारण रावसाहेब शहरातील मातब्बर वकिलांपैकी एक होते, त्यांनी लिहिलेल्या कायद्याविषयीच्या पुस्तकांचा रेफरन्स स्टडी म्हणून विद्यापीठात उपयोग होत असे, राज्यातल्या अनेक  बड्या प्रस्थांची प्रकरणे त्यांनी अगदी सहजच सोडवली होती, त्यांच्या वकिलातीची फी पण तशीच होती. इनामदार पोलीस निरीक्षक असल्यामुळे रावसाहेबांच्या या स्टडीरूम मध्ये ते यापूर्वीही अनेकदा आले होते, पण केसेस बद्दल डिस्कशन करायला. पण आज या स्टडीरूम मध्ये येण्याचं कारण वेगळं होतं. इनामदारांनी कधी कल्पनाच केली नव्हती कि त्यांना या कारणासाठी पण कधी इथे यावे लागेल. इनामदारांनी कल्पना जरी नसली केली तरी एक पोलीस अधीक्षक म्हणून या गोष्टी त्यांना नवीन नव्हत्या. 

इनामदारांनी पो. नि. शिंदे यांना थांबवून घेत आपल्या बाकी टीम ला बाहेर इतरांशी बोलून परिस्थीतीचा अंदाज लावण्यास आणि शक्यतो मिळेल ती माहिती गोळा करण्यास सांगितले. आत्ता स्टडी रूम मध्ये फक्त चारजण होते. इनामदार, शिंदे , डॉक्टर जोशी आणि मृत रावसाहेब. इनामदार आणि शिंदेनी पाहणी सुरु केली, स्टडीरूम अगदी टापटीप होती, रावसाहेबांचे मृत शरीर खुर्चीवर पसरलेल्या अवस्थेत पडले होते, टेबलावर त्यांचा व्हिस्की चा ग्लास पूर्ण भरलेला होता. इनामदार आणि शिंदे आपल्या परीने स्टडीरूम मध्ये मांडलेल्या  गोष्टी तपासून बघत होते. रावसाहेबांच्या गळ्यावर निशाण होते, कोणी तरी त्यांचा गळा आवळला होता, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होती कि गळा आवळून खून झालाय, दोन प्रश्न होते कोणी? आणि का?

"बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची आहे !!" -   डॉ जोशींच्या बोलण्याने इनामदारांचे लक्ष वेधले गेले. रावसाहेबांची बॉडी पोस्टमॉर्टेम ला नेण्यात आली. टीम ने घटनास्थळी पुरावा सदृश असणाऱ्या गोष्टी जमवायला सुरुवात केली. इमानदारांनी  लागणारे सोपस्कार लवकर पूर्ण करायला सांगितले. सगळ्या गोष्टी होई पर्यंत पहाटेचे तीन वाजून गेले होते. इनामदार आणि त्यांचे सहकारी पोलीस स्टेशन ला पोहोचले होते. एका गोष्टीची जाणीव त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना करून दिली कि हि एक हाय प्रोफाइल केस होणार आहे, रावसाहेबांच्या घरातून, नातेवाईकांपासून ते मीडिया, राजकारणी आणि आपल्या सुपीरिअर्स कडन आपल्यावरहि केस लवकरात लवकर सोडवण्यासाठी दबाव येणार आहे तेव्हा ह्या केस मध्ये कुठलीही चूक आपल्याला महागात पडू शकते म्हणून आपल्याला सावधपणे आणि तितक्याच लवकर हि केस सोडवली पाहिजे.     

कोणी केला असेल खून आणि का?

क्रमशः        


Wednesday, April 22, 2020

चिमणराव गुंड्याभाऊ आणि पुण्या मुंबईतल्या कॅब

अश्याच एका संध्याकाळी चिमणराव (चिरा) आणि गुंड्याभाऊ (गुंभा) यांचे चहा पिता पिता अनुनासिक स्वरातले संवाद. आजचा विषय पुण्या मुंबईतल्या 'भाडोत्री गाड्या' अर्थात कॅब.



गुंभा : काय म्हणता ......
चिरा : सांगतो काय !!
गुंभा : मग ?
चिरा : मग काय वाट बघितली, याला माझे स्थान आणि मला याचे स्थान काही मिळेना, बरे भ्रमण ध्वनी वर        
          दाखवतोय कि हा उबरवाला पाच मिनिटांवर आहे.
गुंभा : मग ?
चिरा : मग काय, त्याला म्हटले लेका, आहेस तिथेच थांब मीच ओला करून तिथे येतो.
गुंभा : छे छे छे चिमणराव हे भाडोत्री गाडी प्रकरण म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्या सारखे  झालेय
चिरा : का का गुंड्याभाऊ, असे काय झाले?
गुंभा :  अहो आत्ता  हेच पहा ना, रिक्षा टॅक्सी चालकांची मुजोरी म्हणून  आपण थोडे जास्तीचे पैसे मोजून या कॅब्स            घेतो पण कधी कधी वाटते हेच महाग पडेल कि काय.आत्ता परवाचंच बघा ना
चिरा : काय ते
गुंभा : मी घरी येण्यासाठी कॅब बुक केली, पण मी जिथे उभा तिथे  हि गाडी येईच ना
चिरा : म्हणजे           
गुंभा : चालक म्हणाला मागच्या गल्लीत या
चिरा : मग?
गुंभा : म्हटला २ इमारती सोडून या
चिरा : मग?
गुंभा : रास्ता ओलांडून या
चिरा : मग?
गुंभा :मग मीच म्हणालो, दादा, पोहोचलो मी घरी, धन्यवाद !!
चिरा : एकदा तर मी स्वर्गवासी होता होता वाचलो, आयुष्याची दोरी बळकटच  म्हणायची
गुंभा : का ते ?
चिरा : भ्रमण ध्वनी वर एक संदेश आला
गुंभा : कोणता ?
चिरा : देव तुम्हाला न्यायला येत आहे
गुंभा : काय !!!!
चिरा : हो ना क्षणभर डोळ्यासमोर अंधेरीच आली
गुंभा : अंधेरी??
चिरा : माफ करा अंधारी, अंधेरी ला तर मी उभा होतो, तर मी बोलत होतो हा, संदेश...  हा, माझी तर बोबडीच                वळली.
गुंभा : अरे बापरे ! मग.
चिरा : मग काय,  नंतर कळले 'देव' हे  मला न्यायला येणाऱ्या ड्रायव्हरचे नाव होते
गुंभा : काय हे चिमणराव, तुम्ही पण ना, तुमचं अगदी आमच्या नानांच्या श्रीपती सारखे झालेय
चिरा : श्रीपतीच काय ते
गुंभा : अहो कमला उशीर झाला होता आणि ह्याने कॅब बुक केली होती ना
चिरा : अच्छा
गुंभा : मध्येच हा  ड्राइवर ला म्हणाला  लवकर चालव,  साहेब हरामखोर आहे आमचा, आणि दुसऱ्या क्षणाला     
         नोकरी गेली ना पठ्ठ्याची      
चिरा : कसे काय ???
गुंभा : त्या कॅब चा वाहक त्याचा साहेबच होता, अतिरिक्त कमाई साठी तो कॅब चालवायचा म्हणे.  
चिरा : बरयाचदा हि लोक गप्पा मारून मारून डोक्याचा पार भुगा करून टाकतात हो, वरून हे हि ऐका कि     
         यांची कमाई आमच्या पेक्षा जास्त कशी, आणि वरून आम्ही आमच्या मनाचे राजे, एका  चालकाने चक्क 
         १५ तो ळ्यांची चैन आणि १०-१२ तोळ्यांच्या अंगठ्या, कडे घातले होते, आमच्या संपूर्ण घरचे सोने काढले
         तरी सात आठ तोळ्यांपेक्षा जास्त येणार नाहीत.   
गुंभा : प्रत्येक कॅब च्या वेगळ्या तऱ्हा
चिरा : काऊ बोलावतोय गुंड्याभाऊ, येतो, भेटू पुन्हा. पण जाता जाता एक सत्य सांगतो
गुंभा : काय ते ?
चिरा : उबर चा चालक पावसात भिजला तर ओला होतो

क्षणभर  हंशा ...

आपला  अभि   


  
  

      

Sunday, April 19, 2020

बायकोचे ड्रायविंगचे धडे

घरच्यांची इच्छा म्हणून गाडी घ्यायचे ठरवले आणि सगळ्यांनी ठरवून पांढऱ्या रंगाची नवी कोरी वॅगन आर गाडी घेतली, मला बऱ्यापैकी गाडी चालवता येत असल्यामुळे रोज ऑफिसला येण्या जाण्यासाठी मी गाडी वापरत असे,  पण बायकोचे ऑफिस लांब असल्याने गाडी ने येणे जाणे शक्य नव्हते, पण तरीही ना जाणे एके दिवशी तिला वाटले कि नाही, काही करून गाडी शिकलेच पाहिजे, मी एका मॉडर्न काळातील मॉडर्न स्त्री  आहे, मला गाडी चालवता आलीच पाहिजे, बस्स !!!

कमीत कमी बेसिक तरी तरी काळावं या शुध्ध्द हेतूने मग तिच्या साठी ट्रेनिंग स्कूल ला ऍडमिशन घेतले, रोज एक तास आणि एक कच्चे लायसन्स या बळावर १० दिवसांत ती गाडी चा दरवाजा उघडणे आणि बंद करणे फक्त यांत एक्स्पर्ट झाली कारण ट्रेनिंग स्कुल च्या गाड्या खरेतर ट्रेनरच चालवत असतो बाकी शिकणे वगैरे अंधश्रद्धा, म्हणूनच मागच्या जन्मीचा कोणता तरी बदला म्हणून ट्रेनर ने तिला सांगितले कि घरच्या गाडीवर हात साफ करून घ्या मग तुम्ही एक्स्पर्ट व्हाल, झाले !! 
45,495 Car Driver Stock Vector Illustration And Royalty Free Car ...

गाडीचे L लागणार होते पण त्या आधी L चा बोर्ड व्यवस्थित लावून घेतला, घेतलेल्या जीवन विम्याच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून ठेवली, मेडिकलेम विमा घरच्यांकडे देऊन ठेवला, जवळच्या हॉस्पिटल मधल्या राखीव खाटांची माहिती घेतली, एम्बुलन्स चे नंबर घेऊन ठेवले आणि स्वतःची मानसिक तयारी करून घेतली , आणि मग एके दिवशी म्हणजे एके रात्री रस्त्यावर गर्दी कमी म्हणून बायकोला घेऊन तिला गाडी शिकवायला उतरलो आणि आधी स्वतः चालवत गाडी मेन रोड वर आणली, मग बायकोला ड्रायवर सीट वर बसायला सांगितले, थोडी थेअरी म्हणून तिला A  B C सांगायला घेतली A म्हणजे एक्सलेटर, B म्हणजे ब्रेक आणि C म्हणजे क्लच.

चूक !!!!!! बायको जवळ जवळ किंचाळलीच , "चूक आहे हे".

का ??? मी प्रश्नांकित

"हे ABC नसून CBA आहे, तुम्ही चुकीचं सांगताय" इति सौ

"सौ काही असले तरी हे ABC म्हणूनच  शिकवले जाते", आपला  मुद्दा पटवण्याचा केविलवाणा प्रयत्न, कारण लॉजिकली ती बरोबर होती 

"कसे ?? तुम्ही उर्दू शाळेत इंग्लिश शिकलात का ?"  सौ चं ब्रह्मास्त्र

"ते काही असो सगळ्यांना असेच शिकवले जाते ABC not CBA" .. मी

"ते काही असो ABC चूक आहे, CBA हेच बरोबर" .... हि
Learner Driver Stock Illustrations – 374 Learner Driver Stock ...
ड्रायविंग ट्रेनिंगच्या दुनियेत नवीन क्रांती सुरु होणार होती आणि या क्रांतीची सुरुवात आमची सौ करणार होती.
आमची ढकलगाडी सुरु झाली. एक्सलेटर ब्रेक , एक्सलेटर ब्रेक.

मागून कुणाची तरी अंत्ययात्रा येत होतो, आमच्या गाडीचं स्ट्रगल  बघून  एक जण धावत पुढे आला, त्याने गाडीवर  टक टक केली . आम्ही काच खाली केली, हिला ड्रायवर च्या सीट वर आणि मला बाजूच्या सीट वर बसलेला बघून तो काय समजायचं ते समजला आणि मला म्हणाला. "दादा मागून बॉडी येतेय जरा गाडी बाजूला घ्या, आम्हाला व्यवस्थित स्मशानात पोहचू द्या, एकाचीच बॉडी जाऊद्या "

एकदा  शिकता शिकता आम्ही पेट्रोल पंपावर गेलो अर्थात ड्राइवर सीट वर हि आणि बाजूला मी, पेट्रोल भरल्या नंतर टायर मध्ये हवा भरण्याच्या माझ्या सवयीला अनुसरून हिने सुध्दा गाडी हवा भरायच्या लायनीत उभी केली, टायरमध्ये हवा भरल्या नंतर हिने त्या हवा भरणाऱ्या पोऱ्याला विचारले , "भैया, संसार कि गाडी को बॅलन्स करणे के लिये किधर को  हवा भरते है." माझी आणि त्या पोऱ्याची केविलवाणी नजरा नजर तोवर हिने दुसऱ्या गियर मध्ये टाकून गाडी सुरूपण केली. 

असेच एकदा शिकता शिकता चुकून हिने  नो एन्ट्री मध्ये गाडी घुसवली, माझ्या हि काही लक्ष्यात यायच्या आधी समोर साक्षात ट्राफिक हवालदार अवतरले.  
"काय मॅडम कुठे, नो एन्ट्री आहे " 
हिने रागात माझ्या कडे बघितले, तिची एक नजर सांगून  गेली, लक्ष्य कुठे असते तुमचे?
हवालदार : "मॅडम लायसन्स दाखवा"
त्या नंतर जे घडले त्यावर, शरमेने पाणी होणे, इज्जत चा फालुदा होणे, अब्रू च्या चिंधड्या उडणे अशा वाक्यांचा फील आला . 
"मॅडम लायसन्स दाखवा", या वाक्याच्या उत्तरावर बायकोने चक्क गळ्यातले मंगळसूत्र पुढे केले, आणि माझ्या कडे बोट दाखवून बोलली "हे बाजूलाच बसलेत,". मी गुपचूप उतरलो आणि त्या हवालदार ला फाईन देऊन मी परत गाडीत येऊन बसलो             
                 
Woman driver driving school panic calm Royalty Free Vector
कालांतराने तिची गाडी शिकायची इच्छा कमी झाली, मी पण सुटकेचा निश्वास टाकला, कारण  काही गोष्टी तिला समजावणे खरेच कठीण होते, जसे कि गाडीचे आरसे हे आपले तोंड बघण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी नसतात, ब्रेक मारायचा म्हणजे नवऱ्याचा राग त्यावर काढायचा नसतो वगैरे वगैरे. पण बायकोला गाडी शिकवणे हा सुद्धा एक वेगळा अनुभवच असतो. 

आपला अभि       

        

Tuesday, April 7, 2020

Misheard Lyrics

मित्रांनो, लहानपणापासून आपण अनेक फिल्मी गाणी  ऐकली आहेत, जेव्हा सुरुवातीला आपण काही गाणी  ऐकली तेव्हा आपल्याला त्याचे बोल नीट कळलेच नाही आणि आपणच काही तरी घुसवून त्याच्या अर्थाचा अनर्थ करून टाकला , गम्मत म्हणून आज आपण ती गाणी बघूया  जरा -

ह्रितिक चा फिजा आठवतोय का  "आ थुक मलू मैं तेरे हाथों में".....  थुक???? याच फिल्म मध्ये पिझ्झा च प्रोमोशन देखील झाले होते , "पिझ्झा.... पिझ्झा.... पिझ्झा... पिझा... " यु ट्यूब वर हे गाणे जरूर एका

इशाकजादे आठवतोय का अर्जुन परिणीती चा त्यात होते  " मैं  परेश शाह, परेश शाह, परेश शाह, परेश शाह, आताशे  है जवां" , परेश शाह माझा क्लासमेट होता, त्याची आठवण आली.

रॉय ??? , नाही आठवणार , रणबीर कपूर चा बिग फ्लॉप, पण गाणी सुपरहिट  "Ch*tiya kalaiya ve...." ahem ahem ..

"मेरी ख्रिसमस में तू नाही शायद" ओह नो मोर हॅपी ख्रिसमस फॉर ऋषी कपूर इन गुप्तरोग ..... सॉरी सॉरी प्रेमरोग

"बन्नो तेरा स्वेटर लगे सेक्सी", खरे सांगा , सगळ्यांनी कंगनाला स्वेटरच चढवला होता ना ??

"गालावर खळी डोळ्यांत बुंदी",    .....  बुंदी? बुंदी कशी असू शकेल ??

"गुप्त गुप्त गुप्ताजी" किंवा "गुप्त गुप्त गुब्बारे" असू शकेल actually माहित नाही काय ते .

आणखी तुम्हाला काही माहित असेल तर जरूर कळवा ..
तोवर चालू द्या ऑल टाइम फेव्हरेट - "आप जैसा कोई मेरी जिंदगी मी आये तो बाप बन जाये !!" किंवा  पाप बन  जाये ..

 आपला अभि






सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...